Saturday, June 21, 2025

Konkan : ‘गुलाबी गारवा’ हरवला

Konkan : ‘गुलाबी गारवा’ हरवला

रत्नागिरी : जिल्ह्यात थंडीचा जोर कमी-अधिक प्रमाणात आहे. अजुनही कडाक्याची थंडी नसल्याने अनेक नागरिकांनी ‘स्वेटर’ कपाटातच टांगले आहे. दापोलीत किमान तापमान १३ अंशावरुन २२ अंशापर्यंत तर कमाल ३१.२ वरुन ३५ अंशापर्यंत वाढले आहे. असेच चित्र जिल्ह्यात सगळीकडे असल्याने सकाळी कडाक्याची थंडी जाणवत नाही. दुपारी उष्मा अधिक असून रात्रीच्या सुमारासही हवेत उष्मा जाणवतो.


दिवाळीच्या तोंडावर मोसमी पाऊस माघारी परतल्यानंतर गुलाबी थंडी जाणवायला सुरुवात झाली; मात्र मागील महिन्याभरात तापमानामध्ये चढ-उतार जाणवत आहेत. ग्रामीण भागामध्ये गारवा असला तरीही कडाक्याच्या थंडीची अजुनही प्रतिक्षाच आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस पारा ३३ अंशावर पोचला होता. त्यामुळे दुपारच्या सुमारास उन्हाचा ताप नागरिकांना सहन करावा लागत होता. मतलई वारेही अधूनमधून वाहत असल्याने उत्तरेकडून थंडी कोकणाकडे आलेली नाही. थंडी सुरु झाली की कपाटात घड्या घालून ठेवलेली कानटोपी, स्वेटर, पायमोजे बाहेर काढले जातात. मागील तीस दिवसांमध्ये हे चित्र कधीतरीच पहायला मिळालेले आहे. दुपारच्या सुमारास हवेमध्ये उष्मा असतो.



Air pollution : वायू प्रदूषणामुळे मानसिक विकारात वाढ


सायंकाळ होऊ लागली हवेत गारवा जाणवायला लागणे अपेक्षित असते, परंतु मागील आठ दिवसांमध्ये थंडीची प्रतिक्षाच रहायला लागली आहे. दापोली तालुक्यात सर्वात पारा १३.२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरलेला होता. तेही एकाच दिवसासाठी उर्वरित तालुक्यांमध्ये पारा १८ अंशापर्यंतच होता. हवेत गारवा असला तरीही अधुनमधून गर्मीही होतीच. सकाळच्या बोचरी थंडी नसल्याने अनेकांनी स्वेटर घड्या घालून कपाटात ठेवल्याचे पहायला मिळत आहे. हे वातावरण लवकरच बदलेल अशी आशा रत्नागिरीकरांसह आंबा बागातदार करत आहे. मतलई वारे वाहू लागले की थंडीचा जोर वाढत जातो. १२ व १३ नोव्हेंबरला वारे वाहत होते. पुढे तीन दिवस वाऱ्यांचा जोर कमी झाला. गुरूवारी सायंकाळी हलका वारा होता, पण त्यात जोर नव्हता.



T-20 World Cup : पाकिस्तानच्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस


दरम्यान, यावर्षी आंबा कलमांना मोठ्याप्रमाणात पालवी आलेली आहे. पालवी जून होण्यासाठी अपेक्षीत थंडी पडणे आवश्यक आहे. त्यामुळे मोहोर येण्याची प्रक्रिया लांबेल असा बागायतदारांकडून अंदाज वर्तविला जात आहे. सध्या पालवीच्या बाजूलाच मोहोर असे चित्र अनेक बागांमध्ये पहायला मिळत आहे. बदलत्या वातावरणामुळे हंगाम पुढे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >