मुंबई : मंत्रालयामध्ये एका तरुणाने आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न केला आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी येथील बापू नारायण मोकाशी या तरुणाने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षततेसाठी लावण्यात आलेल्या जाळी मुळे सदर तरुणाचा जीव वाचला.
तीन वर्षांपूर्वी त्याच्या प्रेयसीवर अतिप्रसंग झाला असून याबाबत त्याला न्याय मिळत नसल्याने त्याने कृत्य केले असल्याची माहिती समोर येत आहे. मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करणारा तरुणाचे नाव बापू मोकाशी असा असून त्याचे वय ४३ वर्ष एवढे आहे.
आपल्या प्रेयसीवर अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीला अटक व्हावी आपल्याला न्याय मिळावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपण चार पत्र लिहिली होती. तरीही अद्याप आपल्याला न्याय मिळाला नाही. यासाठी आपण आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याचे त्या तरुणाने सांगितला आहे.
बापू मोकाशी या तरुणाने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली मात्र मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर लावलेल्या जाळीत हा तरुण अडकला त्यामुळे या तरुणाला गंभीर इजा झाली नाही मात्र उडी मारल्यानंतर या तरुणाच्या डोक्याला किरकोळ जखम झाली आहे.
उडी मारल्यानंतर लगेचच मंत्रालयात तैनात असलेल्या पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती त्यामुळे मंत्रालयात मोठी वर्दळ होती राज्यभरातून नागरिक मंत्रालयात आज उपस्थित होते अशातच या तरुणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे तेथे धावपळीचे वातावरण निर्माण झाले. या तरुणाने आत्महत्याचा प्रयत्न केला त्यावेळेस राज्य मंत्रिमंडळाची बैठक देखील सुरू होती.
दरभंगा : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला भारताकडून कशी प्रतिक्रिया दिली जाणार यावरुन तर्कवितर्कांना…
मुंबई : तब्बल १० कोटी रुपयांच्या बनावट 'लेटर ऑफ क्रेडिट' (LC) प्रकरणात सीबीआय न्यायालयाने तीन…
मुंबई: मंगळवारी दि २२ एप्रिल रोजी जम्मू - काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील पर्यटकांच्या…
वरळी BMW अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली हळहळ मुंबई : काही अपघात हे केवळ…
मुंबई : महायुती सरकारने (Mahayuti) महिलांच्या आर्थिक दृष्टया सक्षमीकरणासाठी 'लाडकी बहीण योजना' (Ladki Bahin Yojana)…
मुंबई: जेव्हा चित्रपट रिलीज होणार असतो तेव्हा प्रेक्षकांना तो आवडेल की नाही , चित्रपटाला यश…