Tuesday, July 1, 2025

Shraddha Walker : श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी आफताबला लागले १० तास

Shraddha Walker : श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी आफताबला लागले १० तास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रध्दा वालकर (Shraddha Walker) खून प्रकरणात श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करताना आरोपी आफताबने जेवणाची ऑर्डर देऊन चित्रपट पाहिल्याचा धक्कादायक खुलासा पोलीस तपासात केला आहे.


एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, आफताबने श्रद्धाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. हे तुकडे करून पाण्याने धुण्यासाठी त्याला १० तासांचा कालावधी लागला. थकल्यानंतर आफताबने थोडी विश्रांती घेतली. तेव्हा त्याने जेवण्याची ऑर्डर दिली. नेटफ्लिक्सवर एक चित्रपट पाहिला. त्यानंतर बिअर पित सिगरेट ओढल्याचे आफताबने पोलीस तपासात सांगितले आहे.


दरम्यान, श्रद्धाच्या शरिराचे तुकडे केल्यानंतर तिचा चेहरा जाळल्याची कबुली आरोप आफताबने पोलिसांना दिली आहे. श्रद्धाची ओळख लपवण्यासाठी आफताबने हे कृत्य केले आहे. खूनानंतर शरिराची विल्हेवाट कशी लावायची? याबाबत इंटरनेटवरून माहिती घेतल्याचेही आफताबने पोलिसांना सांगितले आहे.



Birth rate : पनवेलमध्ये घटतोय मुलींचा जन्मदर


आफताबच्या नार्को टेस्टला आता दिल्ली न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यासोबतच, आफताबच्या पोलीस कोठडीमध्ये पाच दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे श्रद्धाचा खून आफताबनेच केला असल्याचा कबुलीजबाब जरी पोलिसांकडे असला, तरी या प्रकरणातले गूढ उकलण्यात या निर्णयामुळे मोठी मदत होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment