soldier : शहीद जवानांना श्रद्धांजली म्हणून भुवनेशकुमारची पदयात्रा

  93

संगमेश्वर (प्रतिनिधी ) : देशासाठी शहीद झालेल्या जवानांना (soldiers) आगळीवेगळी श्रध्दांजली वाहण्याच्या दृष्टीने भुवनेशकुमार गुर्जर याने पदयात्रा सुरु केली असून मजल दरमजल करत तो संगमेश्वर गावमळा येथील हॉटेल राजमुद्रा येथे पोहचला असता संगमेश्वरवासीयांच्या वतीने अविनाश सप्रे यांनी भुवनेशकुमारचे स्वागत केले.


भुवनेशकुमारने ८ ऑगस्ट २०२२ रोजी दिल्ली येथून आपल्या पदयात्रेला प्रारंभ केला आहे. बालपणापासून त्याला सैनिकांबाबत कुतूहल, आस्था वाटत आली आहे. सैनिकांचे शौर्य पाहून नेहमीच आपला उर अभिमानाने भरुन येतो. मात्र लढाई अथवा दहशतवाद विरोधी कारवाई दरम्यान सैनिकांना वीरमरण येते त्यावेळी मनाची समजूत घालणे कठीण होते. अशा वीरगती प्राप्त शहीद सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करुन त्यांना आगळीवेगळी श्रध्दांजली वाहण्यासाठी आपल्या मनात २८ राज्य आणि १५ हजार ६०३ किमी अंतर पायी प्रवासाची संकल्पना सुचली आणि त्याला ८ ऑगस्ट २०२२ रोजी दिल्ली येथे आपण मूर्त रुप दिल्याचे भुवनेशकुमारने सांगितले.



Narayan Rane : नारायण राणे यांनी दिली आरोग्य व्यवस्थेला बळकटी


दिवसा किमान ३० ते ४० किमी अंतर चालायचे आणि रात्रीच्या वेळेला गेस्ट हाऊस, मंदिर, धर्मशाळा, हॉटेल येथे मुक्काम करायचा असा आपला नेम असल्याचे भुवनेशकुमारने सांगितले. पदयात्रेदरम्यान अनेकांचे सहकार्य लाभत आहे. दानशूर व्यक्ती, संस्था, शाळा - महाविद्यालये, हॉटेल व्यावसायिकआपल्याला मदत करत असल्याचे त्याने नमूद केले. प्रत्येक जिल्ह्यामध्ये शहीद जवानांच्या नावाने अमरज्योती अथवा शाळा सुरु व्हाव्यात जेणेकरून पुढील पिढीला देशासाठी बलिदान केलेल्या जवानांच्या शौर्यगाथा कळू शकतील, असाही पदयात्रेचा हेतू असल्याचे भुवनेशकुमार गुर्जरने सांगितले.



अग्रलेख : जी-२० च्या निमित्ताने भारताचा वाढता प्रभाव

Comments
Add Comment

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

रत्नागिरीत युनिट टेस्टमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेतील कमी गुणांमुळे भविष्याच्या चिंतेतून आईने हटकले