Sunday, June 22, 2025

Pollard : पोलार्डची आयपीएलमधून निवृत्ती

Pollard : पोलार्डची आयपीएलमधून निवृत्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डने (Pollard) आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे.


तथापि, तो अजूनही मुंबई इंडियन्सचा भाग असेल कारण संघ मालकांनी त्याच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. या अनुभवी खेळाडूची मुंबई इंडियन्सने फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. आयपीएल २०२३ पासून तो ही जबाबदारी सांभाळणार आहे. एवढेच नाही, तर तो एमआय एमिरेट्सकडून खेळतानाही दिसणार आहे.


कायरन पोलार्ड हा मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा खेळाडू होता. गेल्या १३ हंगामांसाठी तो एमआयचा भाग होता. तो यापुढे आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. परंतु संघाने अधिकृतपणे घोषित केले आहे की, तो फलंदाजी प्रशिक्षक म्हणून त्याच्या नवीन भूमिकेत एमआय कुटुंबासोबत राहील. कायरन पोलार्ड २०१० मध्ये मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आणि संघासाठी १५० सामने खेळणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.


पोलार्ड २०१० पासून आयपीएलशी जोडला गेला आहे. त्याने लीगमधील १८९ सामन्यांमध्ये २८.६७ च्या सरासरीने आणि १४७.३२ च्या स्ट्राइक रेटने ३४१२ धावा केल्या. यामध्ये १६ अर्धशतकांचा समावेश आहे. पोलार्डने फलंदाजीच्या जोरावर मुंबईला अनेक सामन्यांत विजय मिळवून दिला. याशिवाय गोलंदाजीतही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. पोलार्डने आयपीएलमध्ये एकूण ६९ विकेट घेतल्या आहेत. ४४ धावांत चार बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.



महत्वाची बातमी...


sports : खेळपट्ट्यांचा वस्तुपाठ आणि निर्भयता!

Comments
Add Comment