Monday, October 27, 2025
Happy Diwali

G20 : ‘जी २०’ परिषदेत सहभागी झालेले कंबोडियाचे पंतप्रधानांना कोरोनाची लागण

G20 : ‘जी २०’ परिषदेत सहभागी झालेले कंबोडियाचे पंतप्रधानांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली : ‘जी २०’ (G20) परिषदेत सहभागी झालेले कंबोडियाचे पंतप्रधान हुन सेन यांना कोरोनाची लागण झाली आहे. इंडोनेशियातील बाली येथे ही परिषद पार पडत आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे कंबोडियाच्या पंतप्रधानांनी काही दिवस आधीच एशियन परिषदेत जागतिक नेत्यांची भेट घेतली होती. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचाही समावेश होता. या परिषदेनंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान कोरोनाची लागण झाल्याने त्यांनी ‘जी २०’ परिषदेतील सर्व बैठका रद्द केल्या आहेत.

https://twitter.com/PMOIndia/status/1592341735572926464

फेसबुक पोस्टच्या माध्यमातून कंबोडियाच्या पंतप्रधानांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. सोमवारी रात्री आपण चाचणी केली आणि मंगळवारी डॉक्टरांनी कोरोना झाल्याचा अहवाल दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. आपण कंबोडियाला परत जात असून ‘जी २०’ परिषदेतील सर्व बैठका रद्द केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान त्यांनी भेट घेतलेले जो बायडन परिषदेत सहभागी झालेले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांची भेट घेतली आहे.

आपण सोमवारी रात्री उशिरा बालीमध्ये दाखल झालो आणि सुदैवाने फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आणि इतर नेत्यांसोबत डिनरसाठी जाऊ शकलो नाही, असेही ते म्हणाले आहेत. आपल्याला कोरोनाची लागण नेमकी कधी झाली याबाबत काही माहिती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा - सलग तिसऱ्यांदा ‘शी जिनपिंग’ चीनचे राष्ट्राध्यक्ष

दरम्यान कंबोडियात पार पडलेल्या दक्षिणपूर्व आशियाई देशांच्या परिषदेत रविवारी त्यांनी अनेक जागतिक नेत्यांची भेट घेतली होती. यामध्ये अमेरिका, कॅनडा, जपान या देशांचे प्रमुख तसेच रशिया आणि चीनमधील महत्त्वाच्या व्यक्ती सहभागी झाल्या होत्या.

Comments
Add Comment