Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीDoodle : गुगलच्या 'डूडल' स्पर्धेत कोलकाताचा श्लोक विजेता

Doodle : गुगलच्या ‘डूडल’ स्पर्धेत कोलकाताचा श्लोक विजेता

बालदिनानिमित्त घेतली होती स्पर्धा

कोलकाता (वृतसंस्था) : बालदिनानिमित्त गुगलने लहान मुलांकरिता ‘डूडल’ (Doodle) स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेत कोलकाताचा श्लोक विजेता ठरला आहे. आज गुगल होमवर दिसणारे डूडल कोलकाता येथे राहणाऱ्या लहानग्या श्लोकने बनवले आहे.

बालदिनानिमित्त सर्च इंजिन गुगलने आपल्या होमपेजवर टायटलऐवजी खास डूडल डिस्प्ले केले आहे. गुगल नेहमीच वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने असे डूडल डिस्प्ले करत असतो. जे कंपनीच्या क्रिएटिव्ह टीमने डिझाइन केलेले असतात. मात्र आज गुगल होमवर दिसणारे डूडल कोलकाता येथे राहणाऱ्या लहानग्या श्लोकने बनवले आहे. श्लोकची ‘डूडल फॉर गुगल’ स्पर्धेचा विजेता म्हणून निवड झाली आहे. तसेच बालदिनी त्याला विशेष पारितोषिकही मिळाले आहे. श्लोक कोलकात्याच्या न्यू टाऊनमध्ये असलेल्या दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये शिकत आहे.

गुगल दरवर्षी डूडल स्पर्धेचे आयोजन करते. ज्यामध्ये लहान मुलांना त्यांची कल्पनाशक्ती आणि प्रतिभा दाखवण्याची संधी मिळते. डूडल फॉर गुगल स्पर्धेसाठी यंदा देशभरातील १,१५,००० मुलांनी भाग घेतला होता. त्यापैकी सर्वोत्तम डूडल निवडण्यासाठी ऑनलाइन मतदान करण्यात आली. कोलकाताचा विद्यार्थी श्लोक मुखर्जीच्या एंट्रीला विजेते म्हणून सर्वाधिक मते मिळाली. त्यानंतर त्याला विजेता म्हणून घोषित करण्यात आले आहे.

गुगलने दिलेल्या माहितीनुसार, यंदा देशभरातील १०० शहरांमधील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना गुगल डूडल बनवण्याची संधी दिली. यंदाच्या स्पर्धेची थीम ‘कसा असेल माझा भारत पुढील २५ वर्षांत?’ ठेवण्यात आली होती. मुलांनी डूडलमध्ये २५ वर्षांनंतर भारताची कल्पना कशी केली आणि त्यांना कोणते बदल बघायचे आहेत, हे दाखवले. श्लोकने आपल्या चित्रात विज्ञान आणि निसर्ग यांच्यातील समतोल दाखवला आणि योग-आयुर्वेदाचाही समावेश त्यांनी आपल्या डूडल चित्रात केला आहे.

महत्वाच्या बातम्या…

T-20 World Cup : टी-२० विश्वचषक स्पर्धेत षटकार मारण्यात भारतीय संघ अव्वल

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -