Thursday, July 25, 2024
Homeकोकणसिंधुदुर्गExplosion at Lote : लोटेतील डिवाईन कंपनीत स्फोट

Explosion at Lote : लोटेतील डिवाईन कंपनीत स्फोट

आठ कामगार जखमी; पाचजणांची प्रकृती गंभीर

खेड/ चिपळूण (प्रतिनिधी) : लोटे औद्योगिक वसाहतीतील डिवाईन केमिकल कंपनीत रविवारी सकाळी १०.३० वाजता स्फोट (Explosion at Lote) झाला. या अपघातात कंपनीतील आठ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सुरुवातीला उपचारासाठी चिपळूणमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, यातील पाचजणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना नवी मुंबई ऐरोली बर्न हॉस्पिटलमध्ये अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे. कंपनीतील सॉलवंट केमिकलने पेट घेतल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

लोटे एमआयडीसीमध्ये डिवाईन केमिकल ही रासायनिक कंपनी २००७ पासून कार्यरत आहे. कंपनीत रविवारी सकाळी वेल्डिंगचे काम सुरू होते. वेल्डिंगचे काम सुरू असताना आगीची ठिणगी रसायन भरलेल्या ड्रममध्ये पडली आणि त्यामुळे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कंपनीतील ड्रममध्ये सॉलवंट केमिकल भरलेले होते. या अपघातामध्ये सतीशचंद मुकुंदचंद मौर्या, दिलीप दत्ताराम शिंदे, विनय मौर्या, दीपक गंगाराम महाडिक, मयुर खाके, आदिश मौर्या, संदीप गुप्ता, बिपिन मंदार अशी जखमी झालेल्या आठजणांची नावे आहेत. यातील सतीशचंद मौर्या, दिलीप शिंदे, विनय मोर्या, दीपक महाडिक व मयुर खाके या पाचजणांना चिपळुणातील लाईफकेअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले. यातील विनय मौर्या व दिलीप शिंदे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने या दोघांना ऐरोली येथील बर्न हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तर जखमी झालेल्यांमधील आदिश मौर्या, बिपीन मंदार आणि संदीप गुप्ता या तिघांना प्रथम चिपळूणमधील अपरान्त हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, तिघेही होरपळले असल्याने ऐरोली बर्न हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर लोटे पोलीस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. एमआयडीसीचे सहायक अभियंता अरविंद पवार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कंपनीतील कामगार व ग्रामस्थांच्या मदतीने जखमीना रुग्णालयात हलवण्यासाठी प्रयत्न केले. तर अपघात व रुग्णालयात लोटे येथील कार्यकर्ते प्रवीण काते, रवींद्र काते, अरविंद महाडिक आदींनी धाव घेतली होती.

अनेकदा याठिकाणी अशा घटना घडत असतात यापूर्वीही अशा स्वरुपाच्या घटनांमध्ये अनेक कामगारांना जीव गमवावा लागला आहे. दरम्यान या घटनेनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणी अद्याप कंपनी प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

महत्वाच्या बातम्या…

Raj Thackeray : काम करायचं नसेल तर पदं सोडा

Ashish Shelar : जितेंद्र आव्हाड वेडेचाळे करतायेत: आशिष शेलार

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -