मुबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या मुंबई वि भागात शनिवार १९ नोव्हेंबर आणि रविवार २० नोव्हेंबर या दोन दिवसांत अप आणि डाऊन धिम्या मार्गावर, अप आणि डाऊन जलद मार्गांवर तसेच अप आणि डाऊन हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मस्जीद स्थानकांच्या दरम्यान रोड क्रेन वापरून कर्नाक रोड ओव्हर ब्रिज हटविण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. गेल्या वर्षभरातील हा सर्वात मोठा ब्लॉक आहे. या ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या ३६ गाड्या रद्द होणार आहेत.
त्यामुळे बाहेरगावी जाऊ इच्छिणाऱ्या हजारो प्रवाशांचे हाल होणार आहेत. तसेच या कालवधीतील रद्द गाड्यांच्या तिकिटांचा परतावा (रिफंड) लगोलग दिला जाणार असून प्रवाशांच्या सोयीसाठी प्रमुख जंक्शन आणि स्टेशनवर पुरेशा परतावा खिडक्या (रिफंड काऊंटर) उघडल्या जाणार असून प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी मदत कक्षही सुरू करण्यात येणार आहेत. अप आणि डाऊन धिम्या मार्गावर शनिवारी १९ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते रविवारी, २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत सलग १७ तासांचा हा ब्लॉक होणार आहे. तसेच सातवी मार्गिका आणि यार्डात शनिवारी १९ नोव्हेंबर रोजी रात्री ११ पासून ते रविवारी, २१ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री ०२ वाजेपर्यंत सलग २७ तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे.
अप आणि डाऊन हार्बर मार्गावर वडाळा रोड ते छशिमट, अप आणि डाऊन धिम्या मार्गावर भायखळा ते छशिमट / अप आणि डाऊन जलद मार्गावर भायखळा ते छशिमट या मार्गांवर या काळात लोकल सेवा सुरू राहणार नाहीत. त्यामुळे लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत उपनगरीय सेवा भायखळा आणि छशिमट दरम्यान मुख्य आणि हार्बर मार्गावरील वडाळा रोड आणि छशिमट दरम्यान उपलब्ध राहणार नाहीत. मुख्य मार्गावर अप आणि डाऊन उपनगरीय सेवा भायखळा, परळ, दादर आणि कुर्ला स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट/शॉर्ट ओरीजनेट होतील. भायखळा, परळ, दादर, कुर्ला ते ठाणे आणि त्यापलीकडे तसेच हार्बर अप आणि डाऊन लोकल सेवा वडाळा रोड स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट/शॉर्ट ओरीजनेट केल्या जातील. वडाळा रोड ते कुर्ला आणि त्यापलीकडे उपनगरीय गाड्या कमी वारंवारतेने चालवल्या जातील. विवारी चालवण्यात येणाऱ्या एसी लोकल सेवा उपलब्ध नसतील. यामुळे मुंबई महापालिकेला ब्लॉक प्रभावित भागात पुरेशा बसेस चालवण्याची विनंती केली आहे.
मुंबई : पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५० लाख…
मुंबई : प्रेक्षकांना नेहमीच मनोरंजनासाठी चटपटीत मसालेदार कंटेन्ट हवा असतो. या स्पर्धेत मराठी चित्रपटांनी सगळ्याच…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकार हाय अलर्ट मोडवर आहे. सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये…
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी २६ जणांची हत्या केली. नाव आणि धर्म विचारुन…
महिलांना किंवा मुलींना ब्लाऊजचे नवीन नवीन पॅटर्न शिवण्याची खूप आवड असते. कोणत्याही समारंभात साडी नवीन…
मुंबई : वांद्रे येथे लिंकिंग रोडवरील लिंक स्क्वेअर मॉलमध्ये असलेल्या क्रोमा शो रूमला आग लागली.…