विराट, सूर्या 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट'च्या रेसमध्ये

मेलबर्न (वृत्तसंस्था) : टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीचा थरार उद्या रविवारी रंगणार आहे. या सामन्यापूर्वी आयसीसीने 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट'च्या संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. या यादीत भारताची रन मशीन विराट कोहली आणि धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव यांना स्थान मिळाले आहे. या यादीत पाकिस्तानचे दोन आणि अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या इंग्लंडच्या तीन खेळाडूंचाही समावेश आहे.


या यादीत न्यूझीलंडचा एकही खेळाडू स्थान मिळवू शकलेला नाही. या यादीत इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरशिवाय सलामीवीर एलेक्स हेल्स आणि अष्टपैलू सॅम करन यांचाही समावेश आहे. पाकिस्तानचा अष्टपैलू शादाब खान आणि वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी यांनाही या यादीत स्थान मिळाले आहे.


इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यामुळे भारताचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले आहे. उपांत्य फेरीपर्यंत पोहचण्यासाठी विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांचा महत्त्वाचा वाटा आहे. या दोन्ही खेळाडूंनी दमदार खेळी खेळली आहे. विराट कोहलीने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे, तर सूर्यकुमार यादवने तुफानी खेळी खेळली आहे. त्यामुळेच हे दोन्ही खेळाडू 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट'च्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत आहेत.

Comments
Add Comment

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने