Sunday, July 6, 2025

गुजरातमधील १०० ठिकाणी एटीएसची छापेमारी; ६५ जणांना अटक

गुजरातमधील १०० ठिकाणी एटीएसची छापेमारी; ६५ जणांना अटक

अहमदाबाद (वृत्तसंस्था) : गुजरातमधील १३ जिल्ह्यांत १०० हून अधिक ठिकाणी एटीएसने छापेमारी केली आहे. या कारवाईत ६५ जणांना अटक केली आहे. शुक्रवारी रात्रीपासून ही छापेमारी सुरू असल्याचे समजते.


अहमदाबाद, भरूच, सुरत, भावनगर आणि जामनगर येथे छापे टाकण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. बनावट बिलांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची हेराफेरी केल्याप्रकरणी ही छापेमारी केली आहे. मिठाई, रिअल इस्टेट आणि फायनान्सशी संबंधित अनेक गटांवर आयकर विभागाने कारवाई केली आहे. या छापेमारीमुळे रिअल इस्टेट व्यवसायात खळबळ उडाली आहे. यासोबतच फायनान्स ब्रोकर्समध्येही भीतीचे वातावरण आहे. एटीएसने केलेल्या छापेमारीत मोठी बेनामी मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात एटीएसने जीएसटी विभागासोबत संयुक्त कारवाई केली आहे. आतापर्यंत सूरत, अहमदाबाद, जामनगर, भरूच आणि भावनगर या जिल्ह्यांमध्ये १५० ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. करचोरी आणि पैशांच्या व्यवहारासाठी आंतरराष्ट्रीय मार्गांवर हे छापे टाकण्यात येत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा