सत्तारांच्या राजीनाम्यासाठी मविआच्या महिला शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई : महाविकास आघाडीच्या महिला शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टीची मागणी केली. सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.


आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन आम्ही अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याची माहिती शिवसनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी सांगितली. यावेळी महाविकास आघाडीच्या महिला शिष्टमंडळानं राज्यपाल कोश्यारी यांनी निवेदन दिले आहे. हे सरकार बेकायदेशी असल्याचे कायंदे यावेळी म्हणाल्या. आठ वेळा संसदरत्न पुरस्कार मिळवणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्याबद्दल असे चुकीचे वक्तव्य करणे योग्य नसल्याचे कायंदे म्हणाल्या. सत्तारांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील महिला संतापल्या आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री समज देतो म्हणत आहेत, पण सत्तार समज देण्याच्या पलीकडे गेले असल्याचे कायंदे म्हणाल्या.


आत्तापर्यंत अब्दुल सत्तारांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता. मात्र, घेतला नाही. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून तरी मला अपेक्षा असल्याचे कायंदे म्हणाल्या. तसेच धमकवणाऱ्या मंत्र्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणीही कायंदे यांनी केली. यावेळी अब्दुल सत्तारांसह मंत्री रविंद्र चव्हाण, मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधातही निवेदन दिले असल्याचे त्यांनी सांगितले.


राज्याच्या मंत्रीमंडळातील मंत्री जर महिलांचा अपमान करणार असतील तर अशा मंत्र्यांची हकालपट्टी केली पाहिजे. शिंदे सरकारडे थोडी जर नैतिकता असेल तर पुढच्या २४ तासात अब्दुल सत्तारांसह मंत्री रविंद्र चव्हाण, मंत्री गुलाबराव पाटील यांचे राजीनामे घ्यावेत असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी केलं. चुकीची वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना मंत्रीपदाच्या खुर्चीवर राहण्याचा अधिकार नसल्याचे चव्हाण यावेळी म्हणाल्या. महाराष्ट्रातील महिला गप्प बसणार नाही. राज्यातील महिला ही सावित्रीची लेक असल्याचे चव्हाण यावेळी म्हणाल्या.

Comments
Add Comment

नीता अंबानी यांनी सुरू केले कर्करोग व डायलिसिस केंद्र

मुंबई (प्रतिनिधी) : रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक व अध्यक्षा नीता अंबानी यांनी कर्करोग रुग्णांसाठी रिलायन्स

राष्ट्रीय महामार्गावर वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी ‘रेड टेबल टॉप ब्लॉक मार्किंग’

भारतातील पहिलाच प्रयोग नागपूर : वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी जंगलालगतच्या राष्ट्रीय महामार्गांवर ‘रेड टेबल

नीट-जेईईत फसवणुकीला आळा बसणार

२०२६ पासून ‘चेहरेपट्टीची ओळख’ बंधनकारक नवी दिल्ली : देशातील सर्वाधिक महत्त्वाच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश

मुंबईतील वायू प्रदूषण रोखण्यात त्रुटी आढळल्यास सहाय्यक आयुक्तांवर कारवाई

उच्च न्यायालयाचा इशारा मुंबई : मुंबईसह आजूबाजूच्या परिसरातील वायू प्रदूषण रोखण्यातील कारवाईमध्ये त्रुटी

आमदार झालेल्या मुंबईतील माजी नगरसेवकांचे उत्तराधिकारी कोण?

बाळा नर यांच्या प्रभाग ७७मध्ये सर्वाधिक स्पर्धा मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणूक ही महायुतीसाठी प्रतिष्ठेची,

भावी नगरसेवकांचे शहरासह प्रभागाच्या विकासाचे व्हिजन काय?

निवडणूक आयोग अर्जाद्वारे घेणार लिहून सचिन धानजी मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आता