चीनमधील ‘ॲपल’च्या उत्पादनावर लॉकडाऊनचा परिणाम

  86

बिजींग (वृत्तसंस्था) : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे चीनला व्यावसायिक फटका बसत आहे. अनेक शहरांमध्ये लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ॲपल कंपनीच्या प्रोडक्शनवर परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमुळे चीनमधील ॲपल कंपनीचा सर्वात मोठ्या कारखान्यात नवीन उत्पादने बनवण्यावर तात्पुरती मर्यादा घातली आहे. त्यामुळे आयफोन तयार करण्यावर याचा परिणाम झाला आहे. आयफोन प्रोडक्शन थांबल्यामुळे कंपनीला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.


चीनमध्ये नव्याने लागू झालेल्या कोरोनाच्या निर्बंधांमुळे अनेक मोठ्या कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. आयफोन बनवणारी कंपनी ॲपलही या टाळेबंदीच्या कचाट्यात सापडली आहे. रविवारी जारी केलेल्या निवेदनात ॲपल कंपनीने म्हटले आहे की, त्यांनी चीनमधील त्यांच्या असेंब्ली प्लांटमध्ये आयफोन १४ चे उत्पादन तात्पुरते कमी केले आहे. यामुळे ग्राहकांना नवीन आयफोनची वाट पाहावी लागणार आहे. याचा परिणाम नाताळपूर्वीच्या आयफोन शिपमेंटवर होऊ शकतो. या निर्णयाचा ॲपलच्या तिमाही विक्रीवर देखील लक्षणीय परिणाम होणार असून ग्राहकांच्या ॲपलच्या हाय-एंड मॉडेल्सच्या वापरावरही ब्रेक बसेल.


चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहता सरकारने कडक निर्बंध जाहीर केले आहेत. चीनमध्ये ॲपलची सर्वात मोठी मॅन्यूफॅक्चरिंग युनिट म्हणजे सर्वात मोठा कारखाना आहे. चीनने झेंग्झू येथील जगातील सर्वात मोठ्या आयफोन प्लांटमध्ये हजारो कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. परिणामी कंपनीने नियमांमध्ये बदल केला असून येथील प्रोडक्शनही कमी केले आहे. त्यामुळे आता फॉक्सकॉन प्लांटमधील आयफोन तयार करण्यावर तात्पुरते निर्बंध घालत प्रोडक्शनचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. यामुळे आयफोनच्या प्रतिक्षेत असणाऱ्या ग्राहकांना वाट पाहावी लागणार आहे.


दरम्यान, काही दिवसांपूर्वी चीनमधील ॲपलच्या याच फॅक्ट्रीमधील कामगारांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. या व्हीडिओमध्ये ॲपल फॅक्टरीतील फॉक्सकॉनचे कर्मचारी चक्क पळ काढताना दिसत होते.

Comments
Add Comment

अल्लाहच्या शत्रूंना नेस्तनाबूत करू, ट्रम्प-नेतन्याहू यांच्याविरोधात इराणच्या शिया धर्मगुरूंचा फतवा

नवी दिल्ली: इराणचे शीर्ष शिया धर्मगुरूंनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि इस्त्रायचे पंतप्रधान

रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हवाई हल्ला, एफ-१६ लढाऊ विमानाचा पायलट ठार

क्वीव: युक्रेनच्या हवाई हद्दीवर रशियाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला आहे. युक्रेनचे अध्यक्ष

पाकिस्तान : आत्मघातकी स्फोटात १६ सैनिकांचा मृत्यू

उत्तर वझिरिस्तान : पाकिस्तानमधील उत्तर वझिरिस्तानमध्ये स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने सैनिकांच्या वाहनाला धडक

शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात कोणते प्रयोग करणार ?

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक : शुभांशू शुक्ला हे अंतराळात गेलेले दुसरे आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर

अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांच्या सोशल मीडियातील अस्तित्वाची चौकशी होणार

वॉशिंग्टन डी. सी. : अमेरिकेत जाण्याचे स्वप्न बघणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. आता अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज

३ जणांना फाशी, ७०० जणांना अटक... इराणमध्ये मोसादच्या 'अंडरकव्हर एजंट्स'विरुद्ध जलद कारवाई

इराण इस्रायलच्या अंडरकव्हर एजंट्सविरुद्ध जलद कारवाई तेहरान: इराण आणि इस्रायल यांच्यात शस्त्रसंधी (Iran Israel Ceasefire)