सुकामेवा, भाजीपाल्यापाठोपाठ खाद्यतेलही महागले

  154

नाशिक (प्रतिनिधी) : दिवाळी आटोपली आणि फराळाच्या लाडवांचे डबे रिकामे झाले की अनेकांना वेध लागतात ते मेथी आणि डिंकाच्या लाडवांचे. थंडी वाढू लागली की आरोग्यवर्धकतेसाठी हे पौष्टीक लाडू करण्यासाठी घरोघरी महिलांची लगबग सुरू होते. मात्र यंदा भाजीपाला, खाद्यतेलांच्या दरवाढीचा सामना करणाऱ्या नाशिककरांना सुकामेव्याच्या दरवाढीचीही झळ सोसावी लागत असल्याने हे पौष्टीक लाडूही महाग पडणार आहेत.


यंदा सुकामेव्याच्या दरांत २० टक्क्यांपर्यंतची वाढ झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी घसरण दरवाढीमागील महत्त्वाचे कारण असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे. गेल्या आठवड्यापासून थंडी वाढत आहे. त्यामुळे बाजारपेठेत सुकामेवा, डिंक आणि मेथीच्या मागणीत वाढ झाली आहे. परंतु जशी मागणी वाढू लागली तशी दरांतही वाढ होत आहे. शहरात केवळ किसमिस आणि काजू भारतातून आयात होतात तर इतर सर्व सुकामेवा गल्फ देशांसह सर्वाधिक प्रमाणात अफगाणिस्तानाहून आयात केला जातो. गत वर्षभरापासून अफगाणिस्तानातून होणारी आयात कमी झाली आहे. याचबरोबर डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्यदेखील सातत्याने घसरत आहे. घटलेली आयात आणि रुपयाचे घसरणारे मूल्य यामुळे स्थानिक बाजारपेठेवर परिणाम दिसून येत असून, सर्वसामान्य ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागत आहे.


गत काही दिवसांपासून खाद्यतेलांच्या दरांत वाढ होत आहे. दिवाळीपासून स्थानिक बाजारात खाद्यतेलाच्या १५ किलोच्या डब्यामागे साडेतीनशे रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे. दिवाळीमुळे मागणीत झालेली वाढ आता कमी झाल्याने पुढील काही दिवसांत खाद्यतेलांच्या दरांत घसरण होण्याची शक्यता आहे.


परतीच्या पावसाने झोडपल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.आता पाऊस थांबला असला तरी भाजीपाल्याची आवक काही आहे. त्यामुळे कारले, टोमॅटो, दुधी भोपळा, घेवडा या फळभाज्या वगळता इतर सर्वच भाज्यांचे दर चढेच आहे. यातही शेवगाची आयात कमी असल्याने त्याचे दर प्रतिकिलो दोनशेपार गेले आहे.


असे दर (प्रती किलो)


काजू : ८४० ते ९०० रु
बदाम : ७०० ते ७५० रु
मनुका : ३०० ते ३२० रु
पिस्ता : १२०० ते १२५० रु
आक्रोड : ७०० ते ८०० रु
खजूर : १४० ते १८० रु
खोबरे : १८० रु
मेथी : १५० रु
डिंक : २४० रु
गुळ : ५५ रु

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट ! पालघर जिल्ह्यात आज शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील काही भागांत पाऊस धुमाकूळ घालणार असल्याचा

तीन महिन्यात पुणे एसटी विभागाने केली कोट्यवधींची कमाई

पुणे : उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विविध भागांतील नागरिकांना आपल्या गावी पोहोचवण्यासाठी तब्बल २५ लाख किमीचा प्रवास

अंत्यसंस्काराची तयारी; तो चक्क जिवंत परतला घरी आणि एका क्षणात वातावरण बदलले

जळगाव : रेल्वे रुळावर एक मृतदेह आढळला आणि नातेवाइकांनी ओळख पटवत त्याचे शवविच्छेदनही करून घेतले. घरी तिरडी आणली

College students clashes: पुण्यात भरदिवसा कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये राडा, कॅम्पसमध्ये कोयते आणि हातोड्याने हल्ले

पुणे: शैक्षणिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पुण्यातच विद्यार्थ्यांमध्ये राडा झाल्याचे समोर आले आहे. एका नामांकित

जळगाव बस अपघाताप्रकरणी आमदार जावळे संतापले, PWD अधिकाऱ्यांना दिला दम

जळगाव: भुसावळ रस्त्यावर आज सकाळी एक भीषण अपघात घडला. इंदूरहून जळगावकडे जाणारी श्री गणेश लक्झरी खासगी बस आमोदा

CM Fadnavis podcast Maharashtra Dharma: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ

'महाराष्ट्रधर्म' या विशेष पॉडकास्ट मालिकेचे पहिले चरण प्रदर्शित मुंबई: ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि