Tuesday, April 29, 2025
Homeकोकणरत्नागिरीएनसीसीचे ६० विद्यार्थी करणार समुद्रातून नौकाभ्रमण

एनसीसीचे ६० विद्यार्थी करणार समुद्रातून नौकाभ्रमण

रत्नागिरी (वार्ताहर) : रत्नागिरी एनसीसी येथील विद्यार्थी १५ नोव्हेंबरपासून २४ नोव्हेंबरपर्यंत सागरी मार्गातून कोकण सारथीच्या माध्यमातून नौकाभ्रमण करणार असल्याचे सेकंड नेव्हल युनिट मोहिमेचे कमांडिंग ऑफिसर के. राजेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यामध्ये नेव्ही एअरफोर्स व आर्मीचे ६० विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

गेले अनेक वर्षे कोकणच्या समुद्रामध्ये एनसीसीचे विद्यार्थी नौकाभ्रमण करुन आपल्या शिक्षणाचा पुरेपूर फायदा घेत आहेत. त्यासाठी त्यांची मेहनत आणि अधिकाऱ्यांचे कष्ट सार्थकी ठरतात. रत्नागिरी सेकंड नेव्हल युनिटचे कमांडिग ऑफिसर के. राजेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नेव्ही, एअरफोर्स व आर्मीचे ६० विद्यार्थी या होणाऱ्या कोकण सारथी नौकाभ्रमण मोहिमेत सहभागी होणार आहेत. कोकण सारथी सागरी नौका भ्रमण मोहीम १५ ते २४ नोव्हेंबरपर्यंत राबविली जाणार असून त्यामध्ये प्रामुख्याने नौकाभ्रमणचा अनुभव तसेच जनजागृतीच्या दृष्टीने प्लास्टिकची समस्या दूर करण्यासाठी पथनाट्य यांचे आयोजन करण्यात आले आहे. या नौकाभ्रमण मोहिमेसाठी २ अध्यापकीय एनसीसी अधिकारी, ३ नौका, सुरक्षा बोट, मदत नौका भारतीय हवामान खाते, कोस्टगार्डचे सहकार्य, नेव्ही या सर्वांच्या माध्यमातून प्रत्यक्ष

पाण्याशी झुंज देत लाटांचा सामना करत छात्रांना आपल्या जीवनाचा अनुभव मिळणार आहे. ६० छात्र ज्या बंदरात उतरतील त्या बंदरानजीकच्या लोकवस्तीमध्ये पथनाट्य केली जाणार असून खारफुटीचे संवर्धन आणि स्वच्छतेचा संदेशही दिला जाणार आहे. कोकण सारथी सागरी मोहीम १५ नोव्हेंबरला रत्नागिरी ते वरवडे अशी प्रारंभ होईल त्यानंतर १६ नोव्हेंबरला वरवडे ते जयगड, १७ नोव्हेंबरला जयगड ते तवसाळ व परत जयगड ते बोऱ्या, १९ ला जयगड ते दाभोळ, २० ला दाभोळ ते धोपावे आणि २१ ला दाभोळ ते अंजनवेल, वेलदूर तर २२ ला दाभोळ ते जयगड, २३ ला जयगड ते काळबादेवी आणि २४ ला काळबादेवी ते भगवती बंदर याप्रकारे या नौकाभ्रमणची आखणी करण्यात आल्याचे कमांडिंग ऑफिसर राजेशकुमार यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -