Saturday, July 20, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणसिंधुदुर्गसाठी हा ऐतिहासिक क्षण : नारायण राणे

सिंधुदुर्गसाठी हा ऐतिहासिक क्षण : नारायण राणे

पडवे येथील लाईफटाईम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये यशस्वी बायपास शस्त्रक्रिया!

सिंधुनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच बायपास शस्त्रक्रियेची सोय झाली आणि अमित शंकर परब या चाळीस वर्षीय रुग्णावर पडवे येथील लाईफटाईम हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजमध्ये पहिलीच शस्त्रक्रिया यशस्वी झाली. हा क्षण जिल्ह्याच्या आणि लाईफटाईम हॉस्पिटलच्या दृष्टीने ऐतिहासिक आहे, अशी माहिती पहिल्याच यशस्वी शस्त्रक्रियेनंतर केंद्रीय सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या जिल्ह्यांत आरोग्यविषयक परिपूर्ण सेवा देण्याचे आपले स्वप्न पूर्णत्वास गेले त्याबद्दलचा आनंदही त्याने व्यक्त केला. यावेळी लाईफटाईम हॉस्पिटलच्या अध्यक्षा सौ. निलमताई राणे व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात परिपूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी या दृष्टीने आपले स्वप्न या जिल्ह्यातील या पहिल्याच बायपास शस्त्रक्रियेने पूर्णत्वास जात आहे. त्याचा आपल्याला मनस्वी आनंद होत असून या जिल्ह्यात चांगली व दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी म्हणून पडवे येथील लाईफटाईम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये ही बायपास शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. मुंबई, कोल्हापूर, पुणे, गोवा आदी शहरांत बायपास शस्त्रक्रियेच्या रुग्णांना हलविले जात होते. मात्र आमच्या या रुग्णालयात ही बायपास शस्त्रक्रिया सुविधा सुरू झाली आहे. हे जाहीर करण्यासाठी व या शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचे अभिनंदन करण्यासाठी हा कार्यक्रम झाला.

यावेळी बायपास शस्त्रक्रिया यांचे तज्ज्ञ सर्जन डॉ. अमृत नेर्लोकर, डॉ. विनायक माळी या बायपास शस्त्रक्रिया करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सत्कार नारायण राणे, सौ. निलमताई राणे यांनी केला. त्यांचे कौतुकही केले. या बायपास शस्त्रक्रियेसाठी व या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी आसावरी उपाध्याय यांनी परिश्रम घेतले असून त्यांचेही नारायण राणे यांनी कौतुक केले. या कार्यक्रमावेळी भाजप प्रदेश पदाधिकारी दत्ता सामंत उपस्थित होते.

लाईफटाईम हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर्स, नर्सेस अन्य सर्व कर्मचारी या सर्वांसाठीच हा ऐतिहासिक व आनंदाचा दिवस आहे. या बायपास शस्त्रक्रियेच्या निमित्ताने या हॉस्पिटलमधील डॉक्टर्स व अन्य कर्मचाऱ्यांना स्फूर्ती मिळेल, या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना दर्जेदार रुग्णसेवा मिळेल, अशी ग्वाही नारायण राणे यांनी यावेळी दिली.

दर्जेदार रुग्णसेवा हे आपले स्वप्न

आपले हॉस्पिटल हा धंदा नाही. या जिल्ह्यात दर्जेदार रुग्णसेवा मिळावी हे आपले स्वप्न होते. त्या स्वप्नांची पूर्तता आता होत आहे आणि त्याचा आपल्याला मनस्वी आनंद आहे, असे भावनिक उद्गारही नारायण राणे यांनी यावेळी काढले. जिल्हा व शहर जनतेचे ऋण फेडण्यासाठी या जिल्ह्यात आपण हा प्रोजेक्ट राबविला. आता बायपाससारखी शस्त्रक्रिया होऊन हॉस्पिटल प्रोजेक्ट पूर्णत्वाकडे गेला याबद्दलचे आपल्याला समाधान आहे. मी व माझ्या विरोधातील नेते यामध्ये फरक आहे. या जिल्ह्यात शैक्षणिक सुविधेसाठी शाळा, कॉलेज, इंजिनीअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज अशा विविध शैक्षणिक सुविधांची सोय या जिल्ह्यांत व्हावी म्हणून मी पुढाकार घेतला आहे व तो पूर्णत्वाकडे नेले आहे, असेही नारायण राणे यांनी स्पष्ट केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -