मुंबई : महालक्ष्मी येथील हाजीअली दर्गा येथे दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली असून यासंदर्भातील धमकीचा फोन मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला. हा फोन उल्हासनगरमधून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या फोननंतर तत्काळ हाजीअली परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने हाजीअली येथे १७ अतिरेकी येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांना दिली. ज्या क्रमांकावरून फोन आला, तो क्रमांक नंतर बंद असल्याचे आढळून आले.
दरम्यान, धमकीचा फोन करणारी व्यक्ती मानसिक रूग्ण असून तिच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती मिळत आहे.