अंधेरी पोटनिवडणूकीत ३९१ ज्येष्ठ नागरिकांचे घरून मतदान

मुंबई (प्रतिनिधी) : अंधेरी पूर्व' विधानसभा मतदारसंघात गुरुवारी पोटनिवडणूक झाली. यात एकूण २ लाख ७१ हजार ५०२ मतदारांपैकी ३१.७४ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तर ४३० ज्येष्ठ नागरिकांनी घरूनच मतदानाला सहमती दर्शवली होती. यापैकी ९१ टक्के म्हणजे ३९१ ज्येष्ठ नागरिकांनी घरून मतदान केले आहे.


भारताच्या निवडणूक इतिहासात प्रथमच या निवडणुकीच्या निमित्ताने निवडणूक आयोगाने शारीरिक आजाराने पिडीत व ८० किंवा त्यापेक्षाही जास्त वयस्कर मतदारांसाठी 'घरून मतदान'चा उपक्रम यशस्वीपणे राबविला. या मतदारसंघात ज्येष्ठ नागरिकांची यादी ७ हजारांपर्यंत होती. निवडणूक विभागाने केलेल्या आवाहनाला ४३० ज्येष्ठ नागरिक मतदारांनी घरूनच मतदान करण्यास सहमती दर्शविली होती. मात्र प्रत्यक्षात त्यापैकी ३९२ मतदारांनी (९१ टक्के) घरूनच मतपत्रिकेद्वारे आपला मतदानाचा हक्क बजावला. ज्येष्ठ नागरिकांनी केलेले हे मतदान भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सीलबंद करून जमा करण्यात आले आहे.


दरम्यान ३९२ मतदारांनी ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत 'घरून मतदान' करून आपले लोकशाही विषयक कर्तव्य पार पाडले आहे, अशी माहिती अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली.

Comments
Add Comment

दक्षिण मुंबईची वाहतूक कोंडी सुटणार! महालक्ष्मी रेल्वे ट्रॅकवर बांधला जात आहे एक अनोखा ओव्हरब्रिज

महालक्ष्मी रेल्वे ट्रॅकवर शहरातील पहिला केबल-स्टेड पूल मुंबई: दक्षिण मुंबईतील स्थानिकांसाठी तसेच कामानिमित

बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्याने अनेक खातेधारकांचे पैसे लुबाडले! ED ने आवळल्या मुसक्या

१६.१० कोटींची फसवणूक, बँकेची प्रतिष्ठा खराब मुंबई: बँक ऑफ इंडियाचे निलंबित अधिकारी हितेश कुमार सिंगला याला ईडीने

मुंबईकरांच्या सेवेत लवकरच येणार नविन मोनोरेल

मुंबई : मुंबईतील मोनोरेल, अनेक दिवसांपासून वारंवार बिघाड होत असल्याने अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे .

सुझुकीने दुचाकीच्या किमती केल्या कमी; २२ सप्टेंबरपासून नवीन दर लागू

मुंबई : जीएसटी २.० सुधारणांचे संपूर्ण फायदे ग्राहकांना देईल, अशी घोषणा सुझुकी मोटरसायकल इंडियाने केली आहे.

‘आयफोन १७’च्या लाँचवेळी बीकेसी ॲपल स्टोअरमध्ये गोंधळ

मुंबई: बीकेसी 'जिओ सेंटर'मध्ये ॲपलच्या 'आयफोन १७' मालिकेच्या लाँचवेळी खराब गर्दी व्यवस्थापनामुळे शुक्रवारी

मुंबई अहमदाबाद महामार्गाबाबत मोठा निर्णय

मुंबई : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई अहमदाबाद महामार्गावर दिवसा अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी २