Tuesday, April 29, 2025

अध्यात्म

तुळशी महिमा

तुळशी महिमा शिर्डीत सण देवदिवाळी साई पेटवी पणतीच्या ओळी ।। १।। सडा समार्जन दारोदारी रांगोळी लाडू, करंजी, चकली, पुरणपोळी ।। २।। भक्तांना तोषवी भंडारा पोळी दूध, सरबत, शंकरपाळी ।। ३।। सुगंधी फुलांच्या माळ ओळी तुळशीमंजिरी पानांची टोळी ।। ४।। आरती जोरात वाजविती टाळी टाळ झांज मृदंग चिपळी ।। ५।। साई बागेचा माळी माणुसकीच्या सुगंधाचाच माळी ।। ६।। तुळशी विवाहाची जोरात हाळी भटजी विष्णू तुळसी पाळी ।। ७।। तसेच उभा श्रीकृष्ण तुळशी जवळी विठ्ठल रुक्मीणी तुळसी जवळी ।। ८।। एका पाटावर तुलसीरूपी बालिका उभी दुसऱ्या पाटावर बालश्रीकृष्णाची मूर्ती उभी ।। ९।। अंर्तपाट घेऊन साईची मूर्ती उभी तात्या श्यामा मूर्ती अक्षतासाठी उभी ।। १०।। बहू गलबला न करणे कधी नवरी-नवरा करावी उभी ।। ११।। अक्षता टाकण्यास बालगोपाळ उभे सारे साई आशीर्वादासाठी उभे ।। १२।। बत्ताशे गुळ फुटाणे सारा प्रसाद फळे ते वाटणे ।। १३।। झाल्या मंगलाष्टका हार घालणे कृष्ण तुळशी आनंदी राहणे ।। १४।। सर्व देवांचे आशीर्वाद देणे साईंचे आशीर्वाद ते लेणे ।। १५।। प्रेमभरे पुसती साई कशी तुळशी ताई-आई ।। १६।। सांगे घरावर तुळशीपत्र ठेवूनी पाईपाई बालसाई निघाला पर्यटनी ।। १७।। तीर्थक्षेत्र शेकडो पाहूनी ऋषीमुनींचा आशीर्वाद घेऊनी ।। १८।। संत महतांचे पुण्य घेऊनी साईच झाले विठ्ठल-रुक्मिणी ।। १९।। गुरू अनेक करूनी महागुरू झाले साईवदनी ।। २०।। सारे तेज साई चरणी सारेतेज शिर्डी चरणी ।। २१।। झोळीत तुळशी पाने आणि उदी साई सोबत सदोदी ।। २२।। तुळशी स्वच्छ करी वातावरण सदोदी उत्तम प्रणवायू सोडी सदोदी ।। २३।। कफ पित्त वायू दूर करी सदोदी चित्तवृत्ती आनंदी ठेवी सदोदी ।। २४।। बागेत हजार तुळशी सत्यनारायण पूजेला हजार तुळशी ।। २५।। विष्णुसहस्त्र नामासोबत तुळशी विष्णूसाई प्रसादतीर्थात तुळशी ।। २६।। बालाजी व्यंकटेशा आवडे तुळशी गणपती आवडे दुर्वा तुळशी ।। २७।। शंकरा आवडे बेल तुळशी नवदुर्गा पार्वती आवडे तुळशी।। २८।। मोगरा अनंत जास्वंदी तुळशी पूजेत नारळ चाफा तुळशी ।।२९।। जन्मता बारशाला देवापुढे तुळशी मुंजीला पूजेत तुळशी ।। ३०।। लग्नात होमात तूप तुळशी प्रत्येक पूजेत लागते तुळशी ।। ३१।। स्वर्गात जाताना तोंडात तुळशी सप्तस्वर्गात काळे तीळ तुळशी ।। ३२।। श्रीकृष्णाचे पारडे जड ठेवता तुळशी साई नाम घेता पावन तुळशी ।। ३३।। श्रद्धा-सबुरी प्रेम साईंचा महिमा साई सांगे सर्वश्रेष्ठ तुळशी महिमा ।। ३४।। विलास खानोलकर
Comments
Add Comment