४ सिलिंडर स्फोटांनी छबिलदास शाळा हादरली, ३ जण जखमी

मुंबई : मुंबईतील दादर परिसरातील छबिलदास शाळेत आज पहाटे तब्बल ४ एलपीजी सिलिंडरचे स्फोट झाले. सुदैवाने शाळेत विद्यार्थी कुणी नसताना पहाटे हा स्फोट झाल्याने मोठी दुर्घटना टळली.

आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास शाळेच्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या ४ सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे शाळेतील तीन कर्मचारी मात्र जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


एकापाठोपाठ ४ सिलेंडर स्फोट झाल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण होते. या स्फोटामुळे शाळेच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले. इमारतीला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. स्फोटामुळे टेरेसचे लोखंडी पत्रे खाली पडले. शाळेच्या आवारात उभ्या असलेल्या दोन कारचेही नुकसान झाले आहे. एकापाठोपाठ चार स्फोटांमुळे दादर परिसर हादरुन गेला होता.


स्फोटाबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाने व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत. सर्व जखमींना तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली, हे अद्याप समजू शकले नाही. अधिक तपास करत असल्याचे दादर पोलिसांनी सांगितले.

Comments
Add Comment

मुंबई आशियातील 'आनंदी' शहर!

टाइम आऊट सर्वेक्षणात पहिले स्थान; ८७% नागरिक खूश नवी दिल्ली: मुंबईला २०२५ साठी आशियातील सर्वात आनंदी शहर म्हणून

गोराईत उभारले जाणार भारतातील पहिले मॅग्रोव्ह पार्क

उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांच्या पुढाकाराने साकारणार प्रकल्प मुंबई : भारतातील पहिले ‘मॅंग्रोव्ह-थीम

अमिताभ बच्चन यांनी विकले २ आलिशान फ्लॅट्स; १२ कोटींना झाला व्यवहार

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील गोरेगाव येथे असलेले त्यांचे दोन लक्झरी फ्लॅट्स विकले

मुंबई महापालिकेचे प्रभाग आरक्षण सोडत ११ नोव्हेंबर रोजी वांद्रे पश्चिम येथील बालगंधर्व रंगमंदिरात

मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५ साठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडतीचा कार्यक्रम जाहीर

मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलने ५ जणांना चिरडले!

मस्जीद बंदर रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना, रेल्वे कर्मचा-यांच्या आंदोलनाने घेतले बळी, दोष कुणाचा? मुंबई :

बीडीडीतील ८४६ रहिवाशांना आठवड्याभरात मिळणार घरे

पहिल्या टप्प्यातील पाच इमारती तयार मुंबई : बीडीडी चाळीतील रहिवाशांना गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर वरळीतील