आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास शाळेच्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या ४ सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे शाळेतील तीन कर्मचारी मात्र जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एकापाठोपाठ ४ सिलेंडर स्फोट झाल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण होते. या स्फोटामुळे शाळेच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले. इमारतीला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. स्फोटामुळे टेरेसचे लोखंडी पत्रे खाली पडले. शाळेच्या आवारात उभ्या असलेल्या दोन कारचेही नुकसान झाले आहे. एकापाठोपाठ चार स्फोटांमुळे दादर परिसर हादरुन गेला होता.
स्फोटाबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाने व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत. सर्व जखमींना तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली, हे अद्याप समजू शकले नाही. अधिक तपास करत असल्याचे दादर पोलिसांनी सांगितले.






