मुंबई : लॅपटॉप चोरल्यानंतर त्या चोराने मालकाची माफी मागणारा ईमेल पाठवला आहे. ज्यात चोराने म्हटले आहे की, त्याला पैशाची गरज होती. आणखी कोणती फाईल हवी असल्यास मला मेल करा, असे आवाहनही चोराने केले आहे. लॅपटॉप मालकाने या ई-मेलचा स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर केला आहे, जो प्रचंड व्हायरल झाला आहे.
चोराने केलेल्या मेलमध्ये म्हटले आहे की, 'कसा आहेस भावा..? मला पैशाची गरज होती. माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी मी खूप धडपडत होतो. त्यामुळे मी काल तुझा लॅपटॉप चोरला. त्याबद्दल मला माफ कर. तसेच चोराने लॅपटॉपच्या मालकाला एक महत्त्वाची फाइलही पाठवली आहे. त्यावर तो असा म्हणत आहे की, ‘मी पाहिले की तुम्ही एका रिसर्चवर काम करत आहात. ती फाईल मी या ई-मेल सोबत जोडली आहे. तुम्हाला दुसरी आणखी कोणती फाईल हवी असल्यास मला सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या आत मेल करा. कारण मला लॅपटॉप खरेदी करणारा व्यक्ती भेटला असून मी तो विकणार आहे.
https://twitter.com/Zweli_Thixo/status/1586655785400033281
या पोस्टला आतापर्यंत २ लाख ८२ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. तर सुमारे ३९ हजार ६०० लोकांनी रिट्विट केले आहे. यामध्ये काही नेटीझन्सनी त्या चोराला नोकरी द्यावी, तर काहींनी लॅपटॉपच्या बदली त्याला पैसे ऑफर करा, असा सल्ला लॅपटॉप मालकाला दिला आहे.