पेणचा स्वरूप अभियांत्रिकी पदवीका परीक्षेत राज्यात प्रथम

पेण (वार्ताहर) : पेण येथील स्वरूप सुदर्शन शेळके या विद्यार्थ्याने अभियांत्रिकी पदविका परीक्षेत ९९.७० टक्के गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात पहिला येण्याचा मान पटकाविला आहे.


कोणत्याही खाजगी कोचिंग क्लासेसला न जाता कॉलेज व्यतिरिक्त दिवसातून ३ ते ४ तास अभ्यास करून त्याने हे यश मिळविल्याचे स्वरूप शेळके यांनी सांगितले. आपल्या यशात कॉलेजचे प्रिन्सिपल मधुकर दाभाडे, डॉ. नितीन लिंगायत, प्रोफेसर दीपिका शेट यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याची प्रतिक्रिया स्वरूप शेळके याने दिली.


कॉलेजने मला संशोधनाकरिता पीएलसी लॅब उपलब्ध करून दिल्यानेच पीएलसी सिस्टीम वर आधारित स्वतंत्र प्रोग्राम तयार करण्यात मला यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे मी कॉलेजचा व कॉलेजच्या शिक्षकांचा आभारी आहे. भविष्यात पदवी अभ्यासक्रम करतानाच यूपीएससी परीक्षा देऊन देशाच्या प्रशासनात हातभार लावून देशसेवा करण्याचा मानस स्वरूप शेळके याने व्यक्त केला.


कॉलेजमधील ९ विद्यार्थ्यांना काही विषय मागील सुमारे २ वर्षांपासून सोडविता आले नव्हते. या विद्यार्थ्यांना स्वरूपने अभ्यासक्रम स्वतःच्या पद्धतीने शिकविला व अभ्यास करण्याची टेक्निकही शिकवली. त्यामुळे स्वरूपची अभ्यासाची रिव्हिजन तर झालीच व या ९ विद्यार्थ्यांना परीक्षेत यश प्राप्त करता आले, अशी माहिती स्वरूपची आई व नॅशनल कॉम्प्युटरच्या संचालीका स्मिता शेळके यांनी दिली.


लोणेरे येथील इंस्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजीनियरिंग (बाटू) या कॉलेज मधून इलेक्ट्रिकल इंजीनिअरिंग पदविकेचे शिक्षण घेणाऱ्या स्वरूप शेळके या विद्यार्थ्यांने पदविका परीक्षेत ९९.७०टक्के मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावुन कॉलेजच्या नावाची प्रतिष्ठा अधिक प्रकाशमान केली आहे, अशी प्रतिक्रिया बाटू कॉलेजचे प्रिन्सिपल डॉ.मधुकर दाभाडे यांनी दिली.

Comments
Add Comment

'महाविस्तार ॲप' जिल्ह्यातील शिवारात क्रांती घडविणार

कृषी विभागाचा एआय तंत्रज्ञानावर विशेष भर ; १८ हजार वापरकर्ते अलिबाग : कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय

पनवेल पालिका भाजप निवडणूक प्रभारीपदी रामशेठ ठाकूर

पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी माजी खासदार

रायगड जिल्ह्यात दहा नगरपालिकांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

उद्या कौल कोणाच्या बाजूने लागणार? अलिबाग : जिल्ह्यात दहा नगरपालिकांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले होते;

अनधिकृत ‘एलईडी’ मासेमारी करणाऱ्यांना मत्स्यव्यवसाय विभागाचा दणका

मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार गस्ती मोहीम; तीन नौकांवर कठोर कारवाई मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत

जिल्ह्यासाठी २८८ कोटींचा विकासनिधी

आराखड्यापैकी ६० टक्के निधी मिळाला, ५० टक्क्यांचे वितरण अलिबाग : राज्य सरकारने नुकतीच दोन वर्षे पूर्ण केली. मात्र

ब्रेक फेल झाल्यामुळे एक्सप्रेस वेवर अपघात, ट्रकचा झाला चेंदामेदा

रायगड : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बुधवारी मोठा अपघात झाला. सिमेंट ब्लॉक घेऊन जात असलेला ट्रक थेट रस्त्याच्या