नाशिक : दिवाळीच्या सुट्ट्यांच्या अनुषंगाने साडेतीन शक्तिपिठापैकी महत्वपूर्ण स्थान असलेल्या आदिशक्ती सप्तश्रुंगी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. त्या अनुषंगाने गुरुवार २७ ऑक्टोबर ते रविवार १३ नोव्हेबर या तीन आठवड्यांच्या कालावधीत आदिशक्ती सप्तश्रुंगी देवीचे मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले राहणार आहे.
महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश राज्यातूनही लाखो भाविक याकाळात सप्तश्रुंगी मातेच्या दर्शनासाठी येत असतात. मागील दोन वर्ष कोविडमुळे तसेच नवरात्री आधी मूर्तीच्या सवर्धन प्रक्रियेसाठीही मंदिर बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळेही अनेक भाविकांना देवीचे दर्शन घेता आले नव्हते.
दिवाळीच्या निमित्ताने शाळा, महाविद्यालय, कार्यालय आदींना सुट्ट्या असतात त्यामुळे येणा-या काही दिवसात वाढणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने दर्शन २४ तास खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. भाविकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…