सिडनी (वृत्तसंस्था) : मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिज लीजेंड सर विवीयन रिचर्ड्स हे दोघे क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाज असल्याचे वक्तव्य भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने केले आहे. क्रीडा वृत्तवाहिनीशी बोलताना विराटने हे वक्तव्य केले.
टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली कमाल फॉर्ममध्ये दिसत आहे. मागील जवळपास दोन वर्षे खराब फॉर्मशी झुंज दिल्यावर आशिया कप २०२२ स्पर्धेमध्ये कोहली फॉर्मात परतला आणि पुन्हा एकदा दमदार खेळीने भारताला सामने जिंकवून देऊ लागला आहे.
दरम्यान, विश्वचषकाच्या सलग दोन सामन्यात त्याने दोन अर्धशतके झळकावली आहेत. गुरुवारच्या सामन्यानंतर क्रीडा वृत्तवाहिनीशी बोलताना विराटने भारताचा महान माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिज लीजेंड सर विवीयन रिचर्ड्स हे दोघे क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाज असल्याचे वक्तव्य केले आहे.