मुंबई : भारत आणि नेदरलँड्स यांच्यात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामना सुरू असताना बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. जय शाह यांच्या ट्विटनुसार, आता भारतीय महिला क्रिकेटपटूंना पुरुषांइतकेच वेतन मिळणार आहे.
जय शाह यांनी ट्विट केले की, भेदभावाचा सामना करण्यासाठी बीसीसीआयने पहिले पाऊल टाकले आहे आणि त्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे. आम्ही आमच्या करारबद्ध महिला क्रिकेटपटूंसाठी समान वेतन धोरण लागू करत आहोत. क्रिकेटमधील समानतेच्या नवीन युगात जात असताना पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंसाठी मॅच फी समान असेल.
महिला क्रिकेटपटूंना पुरुष खेळाडूंप्रमाणेच मॅच फी दिली जाईल. कसोटीसाठी १५ लाख, वन डे साठी ६ लाख आणि टी-२० साठी ३ लाख रुपये दिले जातील. समान वेतन ही आमच्या महिला क्रिकेटपटूंप्रती माझी बांधिलकी होती आणि त्यांच्या पाठिंब्याबद्दल मी सर्वोच्च परिषदेचे आभार मानतो. जय हिंद, असेही जय शाह यांनी ट्विट केले आहे.
याआधी न्यूझीलंडने तीन महिन्यांपूर्वी समान वेतन त्यांच्या महिला व पुरुष क्रिकेटपटूंसाठी जाहीर केले होते.
ठाणे : उन्हाळ्याला सुरुवात झाली असून वाढत्या तापमानानुसार पाण्याच्या पातळीत घट होत चालली आहे. अशातच…
बीजापूर : छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यातील घनदाट जंगलात मागील ४८ तासांपासून गोळीबार सुरू आहे. बीजापूर जिल्हा…
सीमेवर हालचाली वाढल्या, गावं रिकामी केली; सैन्याच्या सुट्ट्याही रद्द... भारत हल्ला करणार या भीतीने पाकिस्तानची…
उन्हाळ्याच्या (Summer) हंगामात घट्ट शूजऐवजी सँडल (Sandals) घालणे खरोखरच आरामदायक आहे. उन्हाळ्याच्या उष्णतेमध्ये शरीराला थंड…
लेले, मोने आणि जोशी परिवाराने सांगितला तिथे घडलेला सर्व थरार मुंबई : काश्मीरच्या निसर्गरम्य खोऱ्यात…
नवी दिल्ली : मंगळवार २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे…