डिजिटल क्रांतीमुळे ग्रामीण भागात वाढला विमा व्यवसाय

Share

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमामुळे डिजिटल तंत्रज्ञानाचा विस्तार झाला असून त्याचा आवाका वाढला आहे. विशेषतः ग्रामीण भागात आणि विमा विभागात हे दिसून आले आहे. ७५० दशलक्ष स्मार्टफोन वापरकर्त्यांसह देशात डिजिटल क्रांती झाली आहे.

डिजिटल तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना उत्पादने किंवा सेवा मिळवण्यासाठी लांबचा प्रवास करण्याची गरज राहिलेली नाही. डिजिटल पेमेंट आणि विशेषतः ‘यूपीआय’ने पेमेंट आणि खरेदी व्यवहारांच्या क्षेत्रात क्रांती केली आहे. यामुळे ग्राहकांना विक्री किंवा सेवेच्या वेळी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज नाहीशी झाली आहे. बदलत्या तंत्रज्ञानाने विमा कंपनीच्या अनेक पैलूंवर सकारात्मक परिणाम केला आहे. जीवन विमा कंपन्यांनी सुलभ दावे निपटारा करण्यासाठी अनेक तंत्रज्ञानावर आधारित प्रक्रिया तयार केल्या आहेत.

विमा कंपन्यांसाठी ‘आधार’ची ‘ई-केवायसी’ मंजुरी ग्राहकांच्या तत्काळ आणि सुरक्षित व्यवहारासाठी महत्त्वपूर्ण आहे. पॉलिसी एकत्रीकरणातले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, जेणेकरून विमा एजंटना कागदोपत्री जास्त काम करावे लागणार नाही आणि हे काम फोटो अपलोड करणे आणि ओटीपीसारख्या सोप्या पर्यायांद्वारे सहज केले जाऊ शकते. प्रमाणित ‘ई-केवायसी’ एजन्सी शोधणे कठीण काम आहे. दोन्हींपैकी एकासह भागीदारीमुळे कव्हर मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. हे ग्रामीण भागातही दिसून येते कारण तिथे आता लोकांकडे ‘आधार’सारखी मूलभूत कागदपत्रे आहेत.

सातत्याने गुणोत्तर प्राप्त करणे हे तंत्रज्ञान वापरकर्त्यांना सहज नूतनीकरण प्रीमियम भरण्यास मदत करते की नाही यावर अवलंबून असते. स्मार्टफोन बँकेच्या ‘इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग’ सेवेला लिंक केल्यामुळे वेगवान सेवेला नक्कीच चालना मिळाली आहे. त्यामुळे प्रीमियम सहज आणि कोणत्याही शुल्काशिवाय स्वयंचलित पध्दतीने डेबिट होऊ शकतो. यामुळे ग्रामीण बाजारपेठांमध्ये, विशेषत: बँका किंवा विमा कंपन्या नसलेल्या भागात, पॉलिसी सुरू ठेवण्यात सर्वात मोठा फरक पडतो. ग्राहकांना या सुविधा मिळतात. ग्रामीण भागातल्या दाव्यांना प्रतिसाद देण्याच्या पद्धतीत मोठा बदल झाला आहे. तंत्रज्ञानाने वेग आणि स्पष्टता वाढवली आहे आणि हे सर्व घटक एकत्र आल्यास कंपन्या व्यवहारांवर अधिक लक्ष केंद्रित करू शकतील.

‘डिजिटल प्लॅटफॉर्म’वर स्थानिक भाषांच्या अधिक वापरामुळे ग्राहकांपर्यंत पोहोचण्यातले अनेक अडथळे दूर झाले आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाच्या आगमनाने, ग्राहक नामनिर्देशित व्यक्तीशी संबंधित बदल सहज करू शकतात आणि गरजेनुसार पॉलिसीचे सक्रियपणे नियमन करू शकतात. या सर्व बाबतीत त्यांना कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीची आवश्यकता भासत नाही. विविध मूल्यवर्धित सेवा ऑफर करण्याची संधी असूनही, ते प्रमुख नियामक बदलांसाठी ‘टच पॉइंट’ म्हणून कार्य करते. ‘अॅप टेक्नॉलॉजी’, ‘चॅटबॉट्स’, ‘व्हॉइसबॉटस्’, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’, ‘व्हर्च्युअल बीओटी’, ‘सेल्स फोर्स सॉफ्टवेअर’ यासारख्या विविध डिजिटल सुविधांमुळे ग्राहकांना ग्रामीण आणि निमशहरी भारतात विमा उत्पादनांचा लाभ घेता येतो. लवकरच भारतातल्या ग्रामीण भागातल्या ग्राहकांचा अनुभव मोठ्या शहरांमधल्या उत्तम अनुभवासारखाच असेल.

Recent Posts

UPSC CSE Result : ‘यूपीएससी’चा निकाल जाहीर! महाराष्ट्राचा अर्चित डोंगरेने मारली बाजी

नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…

25 minutes ago

लँड स्कॅमचा बादशाह उद्धव! आशिष शेलारांचा थेट घणाघात

मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…

26 minutes ago

Heart Attack: गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ का झाली आहे? अभ्यासात मोठा खुलासा

कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…

1 hour ago

Pune News : पुण्यात रोड रेजचा धक्कादायक प्रकार; हॉर्न वाजवला म्हणून जोडप्याला मारहाण

पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…

1 hour ago

Devmanus 3 : ‘या माप घेतो म्हणत’ देवमाणूस परत आला! पहा थरारक प्रोमो

मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…

1 hour ago

Abhijna Bhave: स्वामींच्या मठात जाताना अभिनेत्रीच्या नवऱ्याला आला वेगळाच अनुभव!

मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…

3 hours ago