कंपाला (वृत्तसंस्था) : युगांडा देशातील दृष्टिहीन मुलांच्या शाळेला मंगळवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. आगीचे कारण उशीरापर्यंत अस्पष्ट होते.
मिळालेल्या माहितीनुसार युगांडामधील मुकोनो जिल्ह्यातील सलमा स्कूल या दृष्टिहीन मुलांसाठीच्या शाळेला अचानकपणे आग लागली. या आगीत आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना किसोगा येथील हेरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. युगांडा पोलिसांनी तशी माहिती दिली आहे.
या घटनेबाबत युगांडामधील मंत्री काहिंदा ओटाफिरे यांनी अधिक माहिती दिली आहे. या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये बहुतांश छोटी मुले आहेत. घडलेल्या घटनेची पूर्ण चौकशी केली जाईल. या घटनेची चौकशी केल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे ओटाफिरे म्हणाले.
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…