विलास खानोलकर
स्वामींची आनंदी दिवाळी
स्वामी दर्शन दिवाळी
स्वामी मठात रोज दिवाळी ।। १।।
भक्त जाती मंदिरी
दूर करण्या अंधारी।। २।।
नेत्र पट्टी दूरकरी गांधारी
साक्षात श्रीकृष्ण पधारी ।। ३।।
विश्वदर्शन देई श्रीकृष्ण
स्वामी दर्शन दर्शन श्रीकृष्ण ।। ४।।
स्वामी नेत्रच आकर्षण
कोहिनूरचेच तेज आकर्षण ।। ५।।
स्वामी मठ ताजमहाल
स्वामी मंदिर तेजोमहाल ।। ६।।
स्वामी मंदिरी वसुबारस
करिती बालकांचे बारस ।। ७।।
स्वामी मंदिरी रमाएकादशी
भंडाऱ्यात मनसोक्त खाशी ।। ८।।
प्रेमवाहे गोवत्स द्वादशी
स्वामी भक्त सारे वारशी ।। ९।।
पुण्यजमा नरकचतुर्दशी
पुण्याने स्वर्गातच जाशी ।। १०।।
सारी कामे होती पटदिशी
का धावतो दाही दीशी ।। ११।।
करशील रोज लक्ष्मीपूजन
पुण्य करोडोचे स्वामीपूजन ।। १२।।
स्वामीच्या पायी गंगापूजन
स्वामी चरणी बसती देवजन ।। १३।।
नरनारायण गुणीजन
सुवर्णचाफ्याचा सुगंध छान ।। १४।।
स्वामीमंदिरी रोज बलीप्रतिपदा
दुर्गुणाचा बळी अनेकदा ।। १५।।
स्वामी मंदिरी रोज पाडवा
ज्ञान देती अनेक गाढवा ।। १६।।
होई जावईपूजन पाडवा
घरोघरी आनंदी पाडवा ।। १७।।
स्वामीना अभ्यंग स्नान
पुण्यजमा गंगा स्नान ।। १८।।
स्वामी पादुका अभ्यंग स्नान
पुण्य जमा नर्मदा स्नान ।। १९।।
उत्तम जो कार्तिक मासारंभ
प्रत्येक दिन दिवाळी आरंभ ।। २०।।
प्रमादिनाम उत्तम तो संवत्सर
गोवर्धन पूजन अन्नकूट प्रसार ।। २१।।
बहीण-भाऊ साजरा भाऊबीज
स्वामी सर्वत्र वाढवी प्रेमबीज ।। २२।।
असा आनंदी आश्विन
अत्यानंदी कार्तिक दिन ।। २३।।
स्वामी दर्शने प्रत्येक दिन
जळीस्थळीकाष्टी प्रकटदिन ।। २४।।
स्वामी जयंती साजरी जगभर
स्वामीच वाढविती कीर्ती जगभर ।। २५।।
कमी होतील दुष्कर्मा
स्वामी उभे साक्षात ब्रम्हा ।। २६।।
स्वामी नाम अणू रेणू
स्वामी रूपे उभा विष्णू ।। २७।।
स्वामी नरेश खरा परेश
स्वामीरूपी उभा महेश ।। २८।।
स्वामीचरणी संकष्टी चतुर्थी
स्वामी चरणी विनायकी चतुर्थी ।। २९।।
स्वामी चरणी पांडव पंचमी
स्वामी चरणी ज्ञान पंचमी ।। ३०।।
साजरी तेथे रोज रंगपंचमी
शंकर महेशाची नागपंचमी ।। ३१।।
स्वामी साऱ्या देहाचाच तो आत्मा
स्वामी खरा परामात्मा ।। ३२।।
अक्कलकोटात प्रेमदिवाळी
स्वामीनाथ हृदयमंदिरी दिवाळी ।। ३३।।