मुंबई : राज्यात मनसोक्त बरसलेल्या मान्सूनने आज निरोप घेतला आहे. त्यामुळे आता पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. याबाबत हवामान विभागाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. राज्यातून मान्सून पूर्णपणे परतला आहे. त्यामुळे आता दिवाळीत पावसाची शक्यता नाही.
यंदा पावसाने जून ते ऑक्टोबर असा चार महिने मुक्काम केला आणि गेल्या बारा वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद यंदा राज्यात झाली. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षात यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात झालेला हा सर्वाधिक पाऊस झाला आहे. मान्सून परतला असला, तरी पुढील दोन दिवस वातावरणातील स्थानिक घटकांमुळे पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या २४ तासांत कोकणातील एक दोन ठिकाणे वगळता राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची नोंद नाही.
परतीचा पाऊस आणखी किती दिवस पडणार याची चिंता शेतकऱ्याला होती. मात्र मान्सून राज्यातून परतल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र ओडीशा आणि बंगालच्या किनारपट्टीवर सीतरंग चक्रीवादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे त्याचा फटका ओडीशा आणि बंगाल या दोन राज्यांना बसण्याची शक्यता आहे. असे हवामान विभागाने सांगितले आहे.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…