सोनेरी, चंदेरी पदकाच्या प्रकाशाने चमकला रायगड किल्ला

Share

रायगड (वार्ताहर) : जिद्द, आत्मविश्वास आणि प्रचंड मेहनतीच्या बळावर ३६व्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातील गुणवंत युवा खेळाडूंनी सोनेरी यश संपादन केले. १४० विक्रमी पदकांची कमाई करत महाराष्ट्र संघ उपविजेतेपदाचा मानकरी ठरला. या दरम्यान मिळालेल्या बहुमानाच्या ट्रॉफीला घेऊन महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने धनत्रयोदशीच्या दिवशी रायगड किल्ल्यावर शिवरायांना मानाचा मुजरा केला. युवा खेळाडूंच्या सोनेरी आणि चंदेरी यशाच्या या ट्रॉफीने किल्ले रायगडचा परिसर उजळून निघाला. ऑलम्पिक संघटनेने हा वेगळ्या प्रकारचा उपक्रम राबवला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेहून सोनं लुटले आणि ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आपल्या खेळाडूंनी कष्टाने सर्वाधिक पदके जिंकली. शनिवारी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर आपल्या खेळाडूंनी हे चषकरुपी धन शिवरायांच्या चरणी अर्पण करून खऱ्या अर्थाने मानवंदना दिली.

गुजरातच्या मैदानावर महाराष्ट्र संघाचा हा गौरव खऱ्या अर्थाने युवा खेळाडूंसाठी बहुमोल ठरला आहे. पदकासाठी त्यांनी दिलेली झुंज ही राज्यातील युवा खेळाडूंना निश्चितपणे प्रेरणा देणारी आहे. याच पदक विजेत्या खेळाडूंच्या कामगिरीचे मोल जाणून आम्ही शिवरायांना चषकाच्या माध्यमातून मानवंदना दिली, अशा शब्दांत महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सचिव नामदेव शिरगावकर यांनी उपक्रमाबद्दल माहिती दिली.

याप्रसंगी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सहसचिव नामदेव शिरगावकर, पथक प्रमुख प्रदीप गंधे, निलेश जगताप, अमित गायकवाड, राजेंद्र घुले, शिवाजी साळुंखे, संदीप वांदळे, क्रीडा अधिकारी रायगड, शिवाजी कोळी- कुस्ती मार्गदर्शक व पदक विजेते खेळाडू यावेळी उपस्थित होते.

Recent Posts

गौतम गंभीरला ISIS Kashmir ने दिली ठार मारण्याची धमकी

नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…

13 minutes ago

Health Tips: उन्हाळ्यात कशी घ्यावी त्वचेची काळजी ? जाणून घ्या

मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…

38 minutes ago

Health Tips: उन्हाळ्यात या घरगुती गोष्टी चेहऱ्यावर लावा!

दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…

2 hours ago

मोदी सरकार भारत – पाकिस्तान सीमा सील करण्यासाठी इस्रोच्या उपग्रहांची मदत घेणार

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…

2 hours ago

Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…

3 hours ago

RCB vs RR, IPL 2025: राजस्थान बेंगळुरूला पराभवाचा धक्का देणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…

3 hours ago