नाशिक (प्रतिनिधी) : राजकारणात केव्हा काहीही घडू शकते, असे म्हणून भाजपा – शिंदे गट आणि मनसे एकत्र येण्याबाबत प्रयत्न चालू असल्याचे संकेत राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
गिरीश महाजन हे शनिवारी नाशिक दौऱ्यावर आले होते, त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एका व्यासपीठावर आले, हे केवळ कार्यक्रमाचे निमित्त होते. यामध्ये कोणतेही राजकारण नव्हते. परंतु राजकारणात केव्हा काहीही घडू शकते, असे सांगून महाजन यांनी राज्यामध्ये होऊ घातलेल्या राजकीय उलथापालथीबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत.
राज्यातील राजकीय परिस्थितीवर बोलताना गिरीश महाजन पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचे विश्वासू स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर हे नाराज असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यातच नार्वेकर यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर अधिकच उलटसुलट चर्चेला उधाण आले. मिलिंद नार्वेकर यांचे अमित शहा यांच्याशी चांगले संबंध आहेत. मी जे ऐकतोय त्यानुसार नार्वेकर शिवसेनेत नाराज आहेत. शिवसेनेत कोण राहील, अन कोण जाईल, हे सांगता येत नाही, असे महाजन यांनी म्हटले आहे.
उन्हाळ्यात थंडावा देण्यासाठी आपल्या घरातली बाग किंवा कुंड्यांमधली झाडं मदत करतात. पण या उन्हाच्या झळा…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी गोळीबार करुन २६ पर्यटकांना ठार…
नवी दिल्ली/वॉशिंग्टन : पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही संताप उसळला आहे.…
उन्हाळा आला की आपल्याला आहारात बदल करावा लागतो. त्यात मधुमेहींना आणखी बंधनं असतात. कारण, रक्तातली…
सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफलाईन समजले जाते. अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सिंधू नदी पाकिस्तानातील अनेक राज्यांमधून…
पहलगाममध्ये निष्पाप हिंदू पर्यटकांवर थेट धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्या... ३७० हटवल्यानंतर, काश्मीरने लोकशाहीच्या दिशेनं…