किशोर गावडे
मुंबई : अधिकारी इंजीनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड व श्री गणपत माळी गृहनिर्माण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.३० वाजता, महाराष्ट्र मंदिर, समर्थ नगर, भांडुप पश्चिम, येथे सुरेल दिवाळी पहाट, महाराष्ट्र मंदिर प्रस्तुत वारसा संस्कृतीचा हा मराठी वाद्यवृंदाचा हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. यावेळी सांगितिक मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. या मैफिलीत प्रसिद्ध गायक उपस्थित राहणार आहेत.
कोरोना नंतर मोठ्या उत्साहात दिवाळी सण साजरा करण्यात येत असून महाराष्ट्र मंदिरने वारसा व संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे. या मैफिलीत आपण सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अधिकारी इंजीनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड व श्री गणपत माळी गृहनिर्माण संस्था यांच्या वतीने करण्यात आले आहे.