पोलीस भरतीसंदर्भात १८ हजार जागांसाठी जाहिरात निघणार!

नागपूर : आरोग्य विभागातील भरतीसंदर्भात मंत्री गिरीश महाजन यांनी १० हजार १२७ जागांसाठी भरती प्रक्रियेची घोषणा केल्यानंतर २४ तासांच्या आत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस भरतीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या योजनेप्रमाणेच येत्या वर्षभरात महाराष्ट्रात ७५ हजार तरुणांना रोजगार देण्याची योजना राबवणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.


“आम्ही ठरवलंय की येत्या वर्षभरात महाराष्ट्रात ७५ हजार तरुणांना नोकऱ्या द्यायच्या. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही १८ हजार पोलिसांच्या भरतीची जाहिरातही येत्या आठवड्याभरात काढतो आहोत. मुख्यमंत्र्यांनी इतर विभागांनाही निर्देश दिले आहेत. सगळ्या विभागांच्या जाहिराती काढून मोठ्या प्रमाणावर तरुणाईला नोकरभरतीत प्राधान्य देण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातही केला जाणार आहे. रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधीही आम्ही उपलब्ध करून देऊ”, असे फडणवीस म्हणाले.


केंद्र सरकारने १० लाख तरुणांना रोजगार देण्यासंदर्भातील योजनेला आजपासून सुरुवात केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ७५ हजार तरुणांना रोजगार दिला जाईल असे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही रोजगार योजना राबवणार असल्याचे फडणवीस म्हणाले.


नागपूर विमानतळावर देवेंद्र फडणवीसांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी केंद्र सरकार राबवत असलेल्या रोजगार योजनेचे त्यांनी कौतुक केले. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खूप चांगला निर्णय घेतला आहे. १० लाख तरुणांना रोजगार देण्याचा हा प्रकल्प आहे. आज ७५ हजार तरुणांना नोकऱ्या देण्यात येणार आहेत”, असे फडणवीस म्हणाले.

Comments
Add Comment

ऐन दिवाळीत 'काळाचा घाला'! नाशिकजवळ कर्मभूमी एक्स्प्रेसमधून पडून २ युवकांचा दुर्दैवी अंत, १ गंभीर

नाशिक: मुंबईत पोटापाण्यासाठी गेलेल्या आणि दिवाळीच्या सणासाठी आपल्या कुटुंबीयांना भेटायला बिहारच्या दिशेने

प्रेम बिर्‍हाडेचा 'नोकरी'चा दावा खोटा? कॉलेजने उघड केले धक्कादायक सत्य!

पुणे: लंडनमध्ये आपली नोकरी गमावल्याचा भावनिक दावा करत समाजमाध्यमांवर प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या प्रेम

ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का, 'या' बड्या नेत्याने दिले पक्षांतराचे संकेत

मुंबई: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे

यंदा राज्यात दहा ठिकाणी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई : सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने यंदा राज्यात दहा ठिकाणी

‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ विशेष तपासणी अभियानांतर्गत राज्यात ३ हजार ४८५ अन्न आस्थापनांची तपासणी

मुंबई: अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत राज्यात ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ हे विशेष तपासणी

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी अनाथ मुलांसोबत साजरी केली दिवाळी

मुंबई : दिवाळीचा सण म्हणजे फक्त दिव्यांचा, फटाक्यांचा किंवा सजावटीचा उत्सव नाही तर तो माणुसकीचा, प्रेमाचा आणि