मुंबई : कारमध्ये फुग्यांचा स्फोट झाल्याने चार वर्षीय मुलासह तीन जण जखमी झाल्याची एक विचित्र घटना मुंबईतील अंधेरी भागात समोर आली आहे.
वाढदिवसाच्या पार्टीसाठी आणलेल्या फुग्यांचा कारमध्ये स्फोट झाल्याने कारला आग लागली. या अपघातात वाढदिवस असलेल्या चार वर्षीय मुलासह तीन जण जखमी झाले. फुगे विक्रेत्याने फुग्यात हेलियमऐवजी हायड्रोजन भरल्याने हा अपघात झाला.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, कारमध्ये झालेल्या स्फोटातील जखमींमध्ये समावेश असलेल्या मुलाच्या आईने सांगितले की, वाढदिवसाची पार्टी संपल्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो होतो. पार्टीत असणारे काही फुगे आम्ही कारच्या बूटस्पेसमध्ये ठेवले. आम्ही इमारतीच्या गेटजवळ पोहचलोदेखील होतो. नेमके त्याचवेळी फुग्यांचा स्फोट होण्यास सुरुवात झाली. त्याच्या परिणामी आग लागल्याने धूर झाला. कारच्या मागील सीटवर चार वर्षांचा मुलगा होता. तो यामध्ये भाजला.
फुग्यांमुळे एवढा मोठा अपघात होऊ शकतो, हे कोणाला माहीत होते, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. फुग्यात हेलियमऐवजी हायड्रोजन आहे, याची कल्पना फुगे विक्रेत्याने द्यायला हवी होती, असेही त्या महिलेने सांगितले. ही घटना १० सप्टेंबर रोजी घडली. मात्र, त्यानंतरही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तीन जखमींपैकी एकाला १२ दिवस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या घटनेमुळे मुलगा धास्तावला असून थोडा मोठा आवाज झाली तरी तो घाबरतो, असेही अपघातात जखमी झालेल्या या महिलेने सांगितले.
वाढदिवसाच्या पार्टीसाठी या कुटुंबाने अंधेरीतील एक हॉल बुक केला होता. पार्टीसाठी डी. एन. नगरमधील एका फुगे विक्रेत्याला ८० फुग्यांची ऑर्डर दिली होती. त्याने याचे १६०० रुपये घेतले. मात्र, फुग्यात हेलियम ऐवजी हायड्रोजन असेल अशी कोणतीही माहिती दिली नसल्याचे महिलेने सांगितले.
तर, दुसरीकडे फुगे विक्रेत्याने फुग्यात हायड्रोजन वापरल्याने मान्य केले. तसेच त्याने ग्राहकांना याची कल्पना दिली असल्याचा दावा केला. आम्ही मागील १२ वर्षांपासून हा व्यवसाय करत असून दिवसभर हायड्रोजन सिलेंडरजवळ उभे राहत असल्याचे सांगितले. फुग्यांजवळ ज्वलनशील पदार्थ असल्याशिवाय हायड्रोजन पेट घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई आयआयटीतील एअरोस्पेस इंजिनिअरिंग विभागाचे प्राध्यापक आर. के. पंत यांनी सांगितले की, स्फोट होण्यासाठी ज्वलनशील पदार्थ जवळ असावा हे गरजेचे नाही. फुग्यांमधून गळती झाली त्यावेळी कारमध्ये एसी चालू असेल आणि मोबाइल फोनचा वापर याच्या एकत्रित परिणामामुळे स्फोट झाला असावा, असेही त्यांनी म्हटले. फुग्यांमध्ये हायड्रोजनचा वापर थांबवणे हा पर्याय असू शकत नाही. मात्र, लोकांनी हायड्रोजन वापराच्या धोक्याबाबत जागरुक असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
एनटीसी गिरण्यांच्या जागेची शोध मोहीम सुरू करण्याचे म्हाडाला आदेश मुंबई (प्रतिनिधी) : गिरणी कामगारांच्या घरांच्या…
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो लवकरच होणार दाखल मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई शहरात आणि उपनगरात मेट्रोची कामे वेगाने…
पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तांवर मार्केटयार्डात मोठ्या प्रमाणात हापूस आंबा उपलब्ध…
प्रा. नंदकुमार काकिर्डे स्वित्झर्लंडस्थित आय क्यू एअर संस्थेने जागतिक पातळीवरील हवा प्रदूषणाचा व्यापक अहवाल प्रसिद्ध…
उमेश कुलकर्णी अमेरिकेला पुन्हा एकदा महान बनवण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जी पावले उचलत आहेत त्यांनी…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये सोन्याच्या दरांचा वेलू अक्षरश: गगनावर गेला. वर्षभरातील किमतींची तुलना करता सोन्याने…