Sunday, December 7, 2025

ब्रिटनमध्ये पुन्हा सरकार कोसळले!

ब्रिटनमध्ये पुन्हा सरकार कोसळले!

लंडन : ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा सत्तानाट्य सुरू झाले आहे. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेऊन अवघे ४५ दिवस झालेले असताना लिझ ट्रस यांनी आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. खुद्द लिझ ट्रस यांनीच याबाबतची घोषणा पत्रकार परिषद केली. त्यामुळे आता ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान निवडीचे राजकीय चढाओढ निर्माण झाले आहे.

पक्षांतर्गत बंडखोरांचा आवाज तीव्र झाला असून लिझ ट्रस यांच्याविरोधात पक्षाचे १०० सदस्य लवकरच अविश्वास प्रस्ताव आणू शकतात, अशी बातमी समोर आली होती. या अविश्वास प्रस्तावाच्या आधीच लिझ ट्रस यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान, नव्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे खासदार ऋषी सुनक यांचा दावा अधिक भक्कम झाला आहे. सुनक हे पुढचे पंतप्रधान होऊ शकतात, असा विश्वास देशातील बुकींनाही वाटतो आहे.

"सध्याची परिस्थिती पाहता ज्या आश्वासनांसाठी मी लढा देत होते ती आश्वासने मी पूर्ण करू शकेन असे मला वाटत नाही. मी आता पंतप्रधानपदाचा राजीनामा देत असल्याची माहिती दिली आहे. ज्यावेळी मी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला तेव्हा देश आर्थिक पातळीवर स्थिर नव्हता. देशातील अनेक कुटुंबांना बिल कसे भरायचे याची चिंता सतावत होती. आम्ही टॅक्स कमी करण्याचे स्वप्न पाहिले होते. अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न केला. पण सद्यस्थिती पाहता मी या आश्वासनांची पूर्तता करू शकेन असे वाटत नाही. त्यामुळे मी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत आहे", असे लिझ ट्रस म्हणाल्या.

Comments
Add Comment