Tuesday, November 12, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरशालेय जेवण बनवणाऱ्या महिलांना मानधनाची प्रतीक्षा!

शालेय जेवण बनवणाऱ्या महिलांना मानधनाची प्रतीक्षा!

गेल्या तीन महिन्यापासून थकले मानधन, दिवाळीपूर्वी मानधन मिळण्यासाठी शिक्षण विभागाला साकडे

विकमगड (वार्ताहर) : शाळेमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी यासाठी गेल्या अनेक वर्षापासून शालेय पोषण आहार ही योजना अमलात आणली. या शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिजवलेला आहार मध्यांतर भोजन दिले जाते. या मध्यांतर भोजन आहार शिजवण्यासाठी काम करणाऱ्या महिला बचत गट व गरजू महिला यांच्याकडून हा आहार शिजवला जातो. परंतु गेल्या तीन महिन्यापासून या महिलांना मानधनच मिळाले नसून दिवाळीच्या तोंडावर हे मानधन लवकरात लवकर मिळावे यासाठी त्यांनी शिक्षण विभागाकडे आग्रह धरला आहे.

विक्रमगड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा व इतर शाळांमध्ये हा शालेय पोषण आहार योजना राबवली जात असून या महिलांना दिवाळीत तरी आपले मानधन मिळावे यासाठी त्यांच्याकडून मागणी करण्यात येत आहे. तसेच पूरक पोषक आहार व तेल भाजीपाला इंधन यासाठीही शाळा खर्च करत आहे. परंतु आवश्यक असणारे मानधन गेल्या तीन महिन्यांपासून आलेले नाही. त्यामुळे शाळाही किती खर्च करणार, असा प्रश्न शाळेला पडलेला आहे.

दिवाळीनंतर पूरक आहार व तेल भाजीपाला इंधन या सर्वांचे बिल मिळावे असाही आग्रह शाळांनी केला आहे, याबाबत शिक्षण विभागामध्ये चौकशी केली असता शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांचे मानधन आले असून येत्या एक ते दोन दिवसात त्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे सांगितले. परंतु इतर लागणारे वस्तूंचे बिलाचे पैसे आले नसल्याचे सांगण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -