Wednesday, April 23, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेडोंबिवलीकर उग्र वासाने हैराण

डोंबिवलीकर उग्र वासाने हैराण

अज्ञात व्यक्तीने नाल्यात केले १५ केमिकलचे ड्रम खाली, प्रदूषण मंडळाला जाग केव्हा येणार?

प्रशांत जोशी

डोंबिवली : पूर्वेकडील खंबाळपाडा परिसरात मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उग्र वासाने डोंबिवलीकर हैराण झाले आहेत. दुर्गंधी असह्य झाल्याने त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली आहे. दरम्यान, नाल्यात दुर्गंधीयुक्त केमिकल सोडण्यात आल्याने ही दुर्गंधी पसरल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी एमआयडीसी परिसरातील नाले व चेंबर्सची पाहणी केली.

खंबाळपाडा परिसरात बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या आवारात नाल्याच्या चेंबरमध्ये केमिकलने भरलेले १५ ड्रम रिकामे केल्याचे समजून आले. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत हे काम करण्यात आले. या प्रकरणी दुर्गंधीयुक्त केमिकल थेट नाल्यात ओतणाऱ्या अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करणार असून या प्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

याबाबत खंबालपाडा रहिवासी काळू कोमस्कर यांनी सांगितले की, नाल्यामधून एमआयडीसीचे सांडपाणी येत आहे. त्यामध्ये दुर्गंधी येत होती. त्यामुळे कामाचे अध्यक्ष देवेन सोनी यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर सोनी आणि मी स्वतः एमआयडीसी विभागातील प्रत्येक चेंबरची खातरजमा केली. यामधून असे समजून आले की कोणत्याही कंपनीतून अशा प्रकारचे केमिकल सोडल्याचे दिसून आले नाही. त्यानंतर पालिका हद्दीतील जो नाला आहे, त्या ठिकाणी पाहणी करण्यास गेलो. तेव्हा तेथे केमिकल्सचे रिकामे १५ मोठे ड्रम दिसून आले. हेच ड्रम नाल्यात रिकामे केले असतील आणि त्याचाच उग्र वास येत होता. खंबालपाडा नाला येथे जो वास येत होता तसाच वास या ड्रमजवळ येत होता. हेच केमिकल कोणीतरी अज्ञात व्यक्तीने नाल्यात टाकले आहे. दरम्यान पोलिसांनी याची माहिती घेत प्रदूषण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.

सविस्तर तपासानंतर हे ड्रम समोर आले आहेत. नाल्यातून कोणत्याही प्रकारचे केमिकल सोडल्याचे दिसले नाही. पण पालिकेच्या हद्दीत नाल्याजवळ पंधरा ड्रम दिसत आहेत. पण या ड्रमला वास येत आहे तसाच वास नाल्याला येत आहे. वास माशांसारखा येत होता. फूड इंडस्ट्रीतील केमिकल असण्याची शक्यता आहे. फूड इंडस्ट्रीज डोंबिवलीत नाही, त्यामुळे हे ड्रम बाहेरून आले असावेत. पोलिस आणि प्रदूषण मंडळ याचा तपास करेल. -देवेन सोनी, अध्यक्ष, कामा

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -