Thursday, June 12, 2025

मंत्र्याचे ऑपेरेशन सुरु असताना अचानक लाईट गेल्याने फोनच्या टॉर्चवर केली शस्त्रक्रिया!

मंत्र्याचे ऑपेरेशन सुरु असताना अचानक लाईट गेल्याने फोनच्या टॉर्चवर केली शस्त्रक्रिया!

औरंगाबाद : शिंदे गटातील नेते आणि मंत्री संदीपान भुमरे यांची शस्त्रक्रिया सुरु असताना अचानक लाईट गेल्यामुळे औरंगाबाद येथील सरकारी रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. विशेष म्हणजे लाईट गेल्यावरदेखील रुग्णालयात जनरेटरची सोय नसल्याने भुमरेंनी संताप व्यक्त केला.


संदीपान भुमरे रविवारी औरंगाबाद येथील सरकारी रुग्णालयाची पाहणी करण्यास गेले होते. पाहणी करताना ते दंत चिकित्सा विभागात पोहोचले. यावेळी विचारपूस करुन त्यांनी डॉक्टरांना त्यांच्या दाताची तक्रार सांगितली. यावर ऑपरेशन करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. ऑपरेशन सुरु असताना, रुग्णालयाची लाईट गेली. तसेच, रुग्णालयात जनरेटरचीदेखील सोय नव्हती.


अखेर, रुग्णालयात ऑपरेशन थिएटरमध्ये अनेक डॉक्टर उपस्थित असल्याने फोनच्या टॉर्चवर त्यांची शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

Comments
Add Comment