देवरूखमध्ये पोलिस इन्स्पेक्टर असल्याची थाप मारत दागिन्यांची चोरी

साडवली (वार्ताहर) : आपण पोलिस इन्स्पेक्टर आहोत, असे सांगून वृद्ध महिलेकडील दोन सोन्याच्या पाटल्या व दोन सोन्याच्या बांगड्या असा एकूण १ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची खळबळजनक घटना साडवली सह्याद्रीनगर येथे घडली आहे. भरदिवसा ही घटना घडल्याने नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. ही चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.


देवरूख पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत धीरज देसाई यांनी देवरूख पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. धीरज देसाई यांची आई कल्पना अनंत देसाई या सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास देवरूख संगमश्वेर या मुख्य रस्त्यावरून ये-जा करत होत्या. याचवेळी एका व्यक्तीने त्यांना आपण पोलीस इन्स्पेक्टर आहोत असे सांगितले.


आताच चोरी झाली असून, तुम्ही सोन्याचे दागिने अंगावर घालून फिरू नका, असे सांगितले. हातातल्या बांगड्या व पाटल्या काढून कागदात ठेवण्यास सांगितले. याचवेळी या व्यक्तीने हातचलाखी करत सोन्याच्या बांगड्या आपल्या ताब्यात घेत नकली बांगड्या कल्पना देसाई यांच्याकडे सुपूर्द केल्या. गळ्यातील सोन्याची चेनदेखील तो मागत होता. मात्र त्यांनी ती काढली नाही. कल्पना देसाई या घरी गेल्यानंतर कागदामध्ये नकली बांगड्या असल्याचे दिसून आले.


प्रकार सीसीटीव्हीत कैद हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या इसमाला दुचाकीवरील दोन जणांनी सहकार्य केल्याचे दिसून येत आहे. अज्ञात चोरट्यांविरोधात देवरूख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदिवसा चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

नववर्षाच्या स्वागतासाठी समुद्रकिनारे गजबजले; डॉल्फिन सफारीसाठी मागणी

गणपतीपुळ्यात १८ हजार पर्यटकांची हजेरी रत्नागिरी : नाताळच्या सुट्टीसह जोडून आलेला विकेंड आणि नववर्षाच्या

नाताळच्या सुट्टीत पर्यटनासाठी गुहागरला गेलेले तिघांचे कुटुंब समुद्रात बुडाले

गुहागर : नाताळच्या सुट्टीनिमित्त पर्यटनासाठी गुहागरला गेलेल्या मुथ्या कुटुंबातील तीन सदस्य समुद्रात बुडाले.

रत्नागिरी नगर परिषदेच्या नगरसेवकांची यादी समोर, जाणून घ्या सविस्तर

प्रभागानुसार उमेदवारांची यादी प्रभाग क्रमांक १ जागा क्रमांक अ (सर्वसाधारण स्त्री): खेडेकर वैभवी विजय (शिवसेना) =

खेड - मंडणगड मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

खेड : खेड–मंडणगड मार्गावर एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा

शिवसेना नेते रामदास कदम यांना मातृशोक

मुंबई : शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या मातोश्री लीलाबाई गंगाराम कदम यांचे वृद्धापकाळाने निधन

दीड वर्षांच्या जलतरणपटू 'वॉटर बेबी' वेदाने इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड वर कोरलं नाव

रत्नागिरी : वय फक्त दीड वर्ष… आणि कामगिरी थेट राष्ट्रीय स्तरावर! रत्नागिरीच्या वेदा सरफरेने देशातील सर्वात लहान