अंधेरी पोटनिवडणुकीचा निर्णय भाजपचे केंद्रीय नेतृत्व घेणार!

Share

मुंबई : अंधेरी पोटनिवडणूक लढवावी की बिनविरोध करावी, यावरून भाजपमध्ये एकमत होत नसल्याने आता भाजपचे केंद्रीय नेतृत्व याबाबत निर्णय घेतील, अशी चर्चा आता सुरू झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीबाबत भाजपमध्ये आता दोन भिन्न मतप्रवाह असल्याचे आता समोर येत आहे. निवडणूक लढवण्यासाठी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार व भाजपचे उमेदवार मुरजी पटेल आग्रही आहेत. तर, या निवडणुकीत पराभव झाल्यास आगामी मुंबई पालिका निवडणुकीत भाजपला मोठा झटका बसेल व मुंबई पालिकेतील भाजपची पतच जाईल, असे स्थानिक नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीबाबत विचार करावा, असे देवेंद्र फडणवीसांचे म्हणणे आहे.

यामुळे या पोटनिवडणुकीबाबतचा अंतिम निर्णय भाजपचे केंद्रीय नेतृत्वच घेणार आहे. तसेच, केंद्रीय नेतृत्व या निवडणुकीतून माघार घेण्यास सांगेल, अशी शक्यताही फार कमी असल्याचे सांगितले जात आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. बिनविरोध निवडणुकीकडे कल असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे केंद्राकडून डावलले जाण्याची शक्यता आहे.

आज अंधेरी पोटनिवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होत आहे. शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ही निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन केले आहे. त्यामुळे शिंदे गटही बिनविरोध निवडणुकीच्या बाजूने असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय चर्चा करतात व काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आशिष शेलार हे मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांना कोणत्याही स्थितीत मुंबईत सत्ता हवी आहे. त्यामुळे मुंबईत ताकद वाढवण्यासाठी भाजप सर्व शक्ती पणाला लावत आहेत. अशात अंधेरी पोटनिवडणूक म्हणजे आशिष शेलारांसाठी संधी आहे. ही निवडणूक जिंकल्यास ते मोदी-शहांच्या गुड बुकमध्ये जातील. त्यामुळे भविष्यात त्यांना मोठ्या पदावरही संधी मिळू शकते. ही मोठी संधी म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदही असू शकते. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीची सर्व जबाबदारी आशिष शेलार यांनी स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे. पोटनिवडणुकीसाठी ते अंधेरीतच तळ ठोकून आहेत.

आशिष शेलारांनी अंधेरी पोटनिवडणूक जिंकून दिल्यास पक्षात त्यांचे स्थान अधिक भक्कम होणार आहे. त्यामुळेच ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही असू शकतात, अशी शक्यताही राजकीय जाणकारांनी केली आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीचे भाजप उमेदवार मुरजी पटेल हे गुजराती आहेत. त्यामुळे आता पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यास गुजराती मतदार नाराज होऊ शकतात. तसेच, आशिष शेलार हे अमित शहांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे या निवडणुकीतून मुरजी पटेल माघार घेतील, अशी शक्यता फार कमी असल्याचे सांगितले जात आहे.

Recent Posts

भारतीय वायुसेनेने सुरू केला युद्धाभ्यास

नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई करत आहे. दरम्यान, भारतीय हवाई दलाने 'एक्सरसाईज…

8 minutes ago

नाल्यातून काढलेला गाळ ४८ तासांमध्ये उचललाच पाहिजे, भूषण गगराणी यांचे निर्देश

मुंबई : छोट्या व मोठ्या नाल्यांचे सुयोग्य नियोजन करुन खोलीकरण करावे, नाल्यांमधून उपसलेल्या गाळाची ४८…

38 minutes ago

ज्यांना काश्मीरला जायचं आहे त्यांनी संपर्क साधावा, मनसे नेते संदीप देशपांडे यांचे काश्मीरला जाण्याचे पर्यटकांना आवाहन

मुंबई : “ज्यांना काश्मीरला जायचं आहे, त्यांनी संपर्क साधावा. काश्मीरला जाणाच्या सहलीची सुरुवात आम्ही आमच्यापासून…

1 hour ago

श्रवण दोष बाधित बालक: जागरूकता आणि उपाययोजना

डॉ. राणी खेडीकर: अध्यक्ष बाल कल्याण समिती, पुणे आज फेसबुकवर एक खूप वायरल झालेली पोस्ट…

7 hours ago

मानसिकता समजून घ्यावी लागेल!

रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…

7 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २५ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…

8 hours ago