भांडुपमध्ये भाजपतर्फे मोफत आधार कार्ड शिबिराचे आयोजन

मुंबई : भाजपतर्फे भांडुपमध्ये मोफत आधार कार्ड शिबिराचे आयोजन केले असून या शिबिराला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.


भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्रमांक ११५ तर्फे खासदार मनोज कोटक यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार शाम सावंत यांच्या सहकार्याने भांडुप विधानसभा महिला मोर्चा अध्यक्षा सौ. निकिता नंदकुमार घाडीगावकर यांच्या वतीने सर्वोदय नगर येथील भाजपा कार्यालयात मोफत आधार कार्ड शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. आज सोमवारी या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. बुधवार, १९ तारखेपर्यंत या शिबिराचे आयोजन केले आहे.


या शिबिरामध्ये आधार कार्ड अद्ययावत, नवीन‎ आधार कार्ड काढण्यासाठी मदत केली जात आहे. अनेक नागरिक, विद्यार्थी, वयोवृद्ध यांच्या आधार कार्डात त्रुटी असल्याने‎ घाडीगावकर यांच्या विशेष प्रयत्नाने आधार कार्ड‎ शिबिराचे आयोजन केले आहे.


या‎ शिबिराच्या उद्घाटनावेळी शाम सावंत, रितेश शाम सावंत, दीपक भोईटे, मुकेश बिगानिया, अजित काळे, वर्षा गोलतकर, नारायण परब, विजय सुतार, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते


आधार कार्ड‎ शिबिर यशस्वी करण्यासाठी भांडुप भाजपा विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे सर्व पदाधिकारी मेहनत घेत आहेत.

Comments
Add Comment

Kalyan News: कल्याण स्थानकावर महिला प्रवाशासोबत घडला भयंकर प्रकार

कल्याण: कल्याण रेल्वे स्थानकावर संतापजनक घटना घडली आहे. मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकलमधून रोज लाखो

शिवजयंतीच्या पर्वावर महसूलमंत्र्यांची महत्वाकांक्षी घोषणा

एका दिवसात निकाली काढणार पंधरा महसूल सेवा * 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान जाहीर * राज्यातील सर्व मंडल,

गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातील कंत्राटदाला ५० लाखांचा दंड

दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्‍यान उड्डाणपूलाच्या कामांत दिरंगाई मुंबई (विशेष

कन्नमवार नाल्याची भिंत उभारण्याचा मार्ग मोकळा, ३९ बांधकामांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : विक्रोळी येथील कन्नमवार नगर नाला बाधित करणाऱ्या ४३ बांधकामांपैकी ३९ बांधकामांचे

मुंबईत भव्य प्रवेशव्दार व क्लॅाकटॅावर उभारा, महापौर रितू तावडे यांनी आयुक्तांना सूचना

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबईला दररोज लाखो पर्यटक भेट देत असतात. मुंबईत

अजित पवरांच्या आवाजात खोटी, दिशाभूल करणारी ऑडिओ, व्हिडिओ क्लिप VIRALकरणाऱ्यांवर कडक कारवाई करणार - सुनिल तटकरे

मुंबई :  काही स्वार्थी व्यक्ती राजकीय आणि सामाजिक हेतू साध्य करण्यासाठी अजित पवरांच्या आवाजात खोटी, दिशाभूल