मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मुंबईमध्ये जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील मराठी मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपाने लालबाग, परळ तसेच आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वरळी आदी भागांवर विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. तसेच दहीहंडी आणि नवरात्रौत्सवातील मराठी दांडियानंतर आता दिवाळीमध्येही भाजपाकडून विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आता भाजपाकडून वरळीतील जांबोरी मैदान येथे मराठमोळा दीपोत्सव आयोजित करण्यात आला आहे. १९ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर यादरम्यान, संध्याकाळी साडे सहानंतर आयोजित होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये संगीत आणि खाद्यसंस्कृतीचा सोहळा होणार असून, खास मराठमोळी वेशभूषा स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. या वेशभूषा स्पर्धेत विजेत्या ठरणाऱ्यांना कार इलेक्ट्रिक दुचाकी, दुचाकी अशी बक्षीसे देण्यात येणार आहेत.
भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी एक ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. या ट्वीटमध्ये आशिष शेलार म्हणाले की, दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रीनंतर आता भाजपातर्फे दिवाळीही जोरात साजरी केली जाणार आहे. वरळीच्या जांबोरी मैदानात महाराष्ट्राच्या कला, संस्कृतीचे दर्शन घडवणारी ‘मराठमोळी वेशभूषा’ स्पर्धा आणि मराठमोळा दीपोत्सव आयोजित होणार आहे. मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर 'फौजी' ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध Prabhas Actress Imanvi Esmail: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण…
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढत (Heat Wave) चालली आहे. एप्रिल महिन्यात…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतात सुरू असलेल्या राजकीय…
कोलकाता : पहलगाममध्ये मंगळवारी(दि.२२) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जूनमध्ये भारतात होणारी दक्षिण आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धा अनिश्चित…
मुंबई : पहलगाम हल्ल्यामुळे (Pahalgam Terror Attack) संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली असून संतापाची लाट…
जम्मू काश्मीरला फिरायला गेलेल्या एका कुटुंबासाठी खारट फ्राइड राईस जीवदान ठरले मुंबई: पहलगामच्या बैसारण येथे…