मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा बालेकिल्ला असलेल्या वरळीत दहीहंडी, नवरात्री उत्सवाचे आयोजन केल्यानंतर भाजपाने आता वरळीतल्या जांबोरी मैदानावर दिवाळीत मराठमोळ्या दिपोत्सवाचे आयोजन केले आहे.
भाजपने या संदर्भात ट्विट केले आहे. यंदाची दिवाळी मुंबईकरांनी मराठमोळ्या जोशात, ढंगात साजरी करायची आहे. आपली खाद्य संस्कृती, आपली वेशभूषा, आपल्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीचा सहकुटंब आनंद लुटायचा आहे. आपण सर्व मुंबईकर आमंत्रित आहात. दि. १९ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर, स्थळ – जांबोरी मैदान, वरळी. #आपला_मराठमोळा_दिपोत्सव
वरळी दक्षिण मुंबईतील मतदारसंघ असून हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. काही महिन्यांपासून तर भाजप शिवसेनेला नामोहरम करण्याची एकही संधी सोडत नाही. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने सण – उत्सव साजरा करण्यावर पुन्हा एकदा भर दिला आहे. १९ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात भाजपने मराठमोळ्या दिपोत्सवाचे आयोजन केले आहे.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या…
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…