Thursday, July 18, 2024
Homeअध्यात्मशिर्डीचा दसरा

शिर्डीचा दसरा

विलास खानोलकर

साई म्हणे आज माझी पुण्यतिथी
पृथ्वीवर आलो मी होऊन अतिथी ।। १।।
आकाशातील तारकांसवे होती मला गती
खंडोबाच्या मंदिरात उभा म्हाळसापती ।। २।।
देव यक्ष किन्नर उभे स्वागती
सारे भक्त आनंदाने आरती गाती।। ३।।
जगभर सांभाळली मी नाती
भांडाऱ्यात भक्त प्रसाद भक्षिती।। ४।।
गाय वासरू, पक्षी, कुत्री
तेथे दत्तात्रय अन् ऋषी अत्री।। ५।।
देशपांडे, दाभोलकर, हेमांड पंथ
दासगणूने सांभाळला भक्तिपंथ।। ६।।
नव्हते मला दुःख खंत
दुःखे दूर केली बनून संत।। ७।।
शिर्डी बनले माझे स्थान
पवित्र सर्वात येथून केले प्रस्थान।। ८।।
नव्हता मजला गृहस्थाश्रम
आयुष्यभर सांभाळला सन्यासाश्रम।। ९।।
द्वारकामाई माझी आई
बायजाबाई दुसरी आई।। १०।।
बालपणीच त्यागली खरी आई
जनता जनार्दनच माझी आई।। ११।।
नव्हता शिष्य कोणी दाई
सेवेची केली मी भरपाई।। १२।।
पान फळे, पंचपक्वांन्न
नव्हते माझे कधी अन्न।। १३।।
मी भक्ती भावाचा भुकेला
आयुष्यभर राहिलो अकेला।। १४।।
श्रद्धा, सबुरी, शांती, आनंद
वाटत फिरलो मी परमानंद।। १५।।
लहान-सहान गरीब मुले
अंध अपंग, माझी मुले।।१६।।
साऱ्यांची प्रगती
व कल्याण
हाच माझा जीव की प्राण।। १७।।
२४ तास पेटत होती भक्तीधुनी
चंदन, पेटत होते सुगंधी धुनी।। १८।।
सर्वत्र पसरला प्रेमाचा सुगंध
सारी शिर्डी गुलाबाचा सुगंध।। १९।।
दसऱ्याच्याच दिवशी सोडला प्राण
भक्त माझे सोन्याचे खाण ।। २०।।
उभे देव आकाशी उधळीत फुले
लाखो लोक जमा झाले जणू माझी मुले।।२१।।
ओक्साबोक्क्षी रडत होते सारे
मंत्र माझा होता माणुसकीचा रे ।। २२।।
मीच घेतली तेथे चिरसमाधी
तेथेच भक्ते स्थापिली गादी ।। २३।।
लाखो मज कृपेने प्रज्ञावंत
आनंदाने झालो मी कृपावंत ।। २४।।
पवित्र आत्मा माझा भारतभर
शिर्डी साईचे खरे सरोवर ।। २५।।
राहा प्रेमाने विसरू नका पिता आई
हीच दसऱ्याची विनंती माझी साई ।। २६।।
गरीबसेवेत गाई चाऱ्यात साई
प्रेमळ उदी साखरेत बत्ताशात साई ।। २७।।
नको मला पैसा अडका
श्रीमंत आहे मी वाडा पडका ।। २८।।
बहीण -भाऊ आनंदात न्हाऊ
दसऱ्याला सोने वाटून प्रसाद खाऊ ।। २९।।
वडील, काका, मामा, भाऊ,
साऱ्यांनाच प्रेमाने मान देऊ ।। ३०।।
नको भांडण,नको तंटा
वाजवा रोज साईपुढे घंटा ।। ३१।।
साईनाथ महाराज की जय !!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -