Monday, June 16, 2025

इलॉन मस्क उतरले परफ्यूम व्यवसायात!

इलॉन मस्क उतरले परफ्यूम व्यवसायात!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला, स्पेसएक्स कंपनीचे संस्थापक इलॉन मस्क आता परफ्युम व्यवसायात उतरले आहेत. ब्यूरन्ट हेअर नावाचा ब्रँड त्यांनी बाजारात आणला असून त्याची किंमती ८,४०० रुपये आहे. मस्क यांच्या परफ्युमचे नाव आणि किंमत ऐकून नेटकरी मात्र सैराट झाले आहेत.


मस्क यांनी स्वतः आपल्या ट्विटरवरुन याची घोषणा केली असून त्यांनी आपल्या ट्विटरच्या बायोमध्ये बदल करत परफ्युम सेल्समन असे केले आहे. तसेच आपल्या ब्यूरन्ट हेअर नामक परफ्युम ब्रँडला पृथ्वीवरील सर्वात छान अत्तर असल्याची कॅप्शनही त्याने दिले आहे.


मस्क यांनी याची सविस्तर माहिती देताना म्हटले की, अत्तराचा व्यवसाय हा टाळता येणारा नाही, त्यामुळं मी इतके दिवस कसा दूर राहिलो? आमचा परफ्युम तुम्ही क्रिप्टो करन्सीद्वारे देखील विकत घेऊ शकता. तसेच डोगच्या स्वरुपात तुम्ही याचे पैसे देऊ शकता. या परफ्युमची किंमत १०० अमेरिकन डॉलर आहे. याच्या १०,००० बॉटलची यापूर्वीच विक्री देखील झाली आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात मस्क यांनी म्हटले होते की, बोअरिंग कंपनी लवकरच पुरुषांसाठी सेंट लॉन्च करणार आहे. हा सेंट त्यांना गर्दीतही उभे राहण्यास मदत करेल.


दरम्यान, मस्क यांच्या या घोषणेनंतर ट्विटर युजर्सने मोठ्या प्रमाणावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने मस्कला फ्लेम थ्रोअर अर्थात आग लावणारा असे म्हटले आहे. हा आग लावणार ५०० डॉलरमध्ये मिळेल, असेही त्याने म्हटले आहे. दुसरा म्हणतो, मस्कला नक्कीच आग लावणाऱ्यांकडून याची प्रेरणा मिळाली नसेल. तुमच्या या नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा. तिसऱ्या एकाने म्हटले की, मेंटल रॉकेट मॅनने मेंटल गोष्ट बनवली. इतिहास याची नोंद घेईल.

Comments
Add Comment