सुषमा अंधारे, विनायक राऊत, भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषण केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे व आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन गटांत हाणामारी होईल, या उद्देशाने या तिन्ही नेत्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केली, असा आरोप या नेत्यांवर ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांची बदनामी केल्याचा गुन्हाही या नेत्यांविरोधात दाखल करण्यात आला आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात ठाकरे गटाने नुकतीच महाप्रबोधन यात्रा काढली होती. यानिमित्त झालेल्या मेळाव्यात ठाकरे गटातील नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिंदे गटातील नेत्यांवर टीकेची झोड उठवली होती. आमदार भास्कर जाधव यांनी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषण करताना कागद कसे वाचून दाखवतात, याची नक्कलच करुन दाखवली होती. सुषमा अंधारे यांनीही शिंदेंसह मोदींवर बोचरी टीका करत चाय विकता विकता पंतप्रधानांनी देश विकल्याची टीका केली होती. तर, खासदार विनायक राऊत यांनी शिंदेंसह नारायण राणेंवरही बोचरी टीका केली होती.


ठाण्यातील या मेळाव्यामध्ये प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्तव्य करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मालिन केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. शिंदे गटाचे नौपाडा येथील उपविभाग प्रमुख दत्ताराम गवस यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, विनायक राऊत, भास्कर जाधव, सुषमा अंधारे यांच्यासह ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाचाही यात समावेश आहे.


शिंदे गटाने नौपाडा पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य आणि त्यांची नक्कल करण्यात आली. तसेच, यावेळी नेतेमंडळींनी केलेल्या भाषणामुळे दोन गटांत असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे. या तक्रारीच्या आधारे नौपाडा पोलिसांनी ठाकरे गटाच्या नेत्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आता याप्रकरणी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

राज्यात टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला

पुणे : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापनासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा

Vastu Tips : या वनस्पती घराच्या दारात ठेवणे टाळा, वास्तुशास्त्रानुसार ठरू शकतात अशुभ

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव असतो.

Sleep: शांत आणि गाढ झोपेसाठी या युक्त्या वापरून पहा

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात पुरेशी आणि शांत झोप मिळवणे अनेक लोकांसाठी एक आव्हान बनले आहे. निद्रानाश (Insomnia) ही

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे