Monday, April 28, 2025
Homeताज्या घडामोडीवडिलांनंतर आता मुलगा होणार सरन्यायाधीश

वडिलांनंतर आता मुलगा होणार सरन्यायाधीश

सुप्रीम कोर्टात पुन्हा मराठी झेंडा

सरन्यायाधीश पदासाठी लळित यांनी पुढे केले न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांचे नाव

नवी दिल्ली : न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड हे देशाचे ५० वे सरन्यायाधीश होतील. विद्यमान सरन्यायाधीश यू. यू. लळीत यांनी कायदे मंत्री किरण रिजिजू यांच्याकडे त्यांच्या नावाची शिफारस केली आहे. विद्यमान सरन्यायाधीश यू. यू. लळीत हे ८ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा मराठमोळे सरन्यायाधीश होणार आहेत.

यू. यू. लळीत यांनी २६ ऑगस्ट रोजी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली आहे. त्यांचा कार्यकाल केवळ ७४ दिवसांचा असून ते ८ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत असल्याने केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सरन्यायाधीशांना पत्र पाठवत उत्तराधिकाऱ्याचे नाव पाठवण्याबाबत कळवले आहे.

सध्या न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड हेच ज्येष्ठ आहेत. त्यामुळे पुढील सरन्यायाधीश म्हणून त्यांच्याच नावाची शिफारस होणार असल्याचे मानले जात आहे. त्यांचा कार्यकाल ९ नोव्हेंबर २०२२ पासून १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत म्हणजे दोन वर्षांचा असणार आहे.

यू. यू. लळीत यांनी २७ ऑगस्ट रोजी सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला आहे. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी पाच हजार प्रकरणे निकाली काढली आहेत. तसेच जुने खटले तत्काळ मार्गी लागावेत म्हणून त्यांनी लिस्टिंग सिस्टम सुरू केली आहे.

न्या. चंद्रचूड याचे वडील १६वे सरन्यायाधीश होते

न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे वडील यशवंत विष्णु चंद्रचूड देशाचे १६ वे सरन्यायाधीश होते. त्यांचा कार्यकाळ २२ फेब्रुवारी १९७८ पासन ११ जुलै १९८५ पर्यंत म्हणजे जवळपास ७ वर्षांपर्यंत होता. वडील रिटायर झाल्यानंतर जवळपास ३७ वर्षांनी चंद्रचूड त्याच खुर्चीवर बसतील. चंद्रचूड यांनी आपल्या वडिलांचे २ मोठे निर्णयही पालटलेत. ते आपल्या ठाम निर्णयांसाठी ओळखले जातात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -