Tuesday, April 29, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

शिंदे गटाला मिळाली ‘ढाल-तलवार’

शिंदे गटाला मिळाली ‘ढाल-तलवार’

नवी दिल्ली : शिवसेनेतील शिंदेगटाला अखेर ‘ढाल-तलवार’ हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. काल उद्धव ठाकरे यांच्या गटाला 'मशाल' हे चिन्ह मिळाले. त्यानंतर शिंदे गटाला कुठले चिन्ह मिळणार याबाबत जोरदार चर्चा होती.

निवडणूक चिन्हासाठी शिंदे गटाने निवडणूक आयोगाला दोन मेल पाठवले होते. पहिल्या मेलमधून शंख, तुतारी आणि रिक्षा ही तीन चिन्हे तर दुसऱ्या मेलमध्ये ढाल-तलवार, सूर्य, पिंपळाचे झाड हे तीन चिन्ह आयोगासमोर ठेवण्यात आले होते. त्यापैकी ‘ढाल-तलवार’ हे चिन्ह शिंदे गटाला मिळाले आहे.

Comments
Add Comment