नाशिक बस दुर्घटनेतील आरोपी ट्रक चालकाला पोलिसांकडून अटक

नाशिक : आडगाव पोलिसांनी काल मध्यरात्री नाशिक बस अपघातातील संशयित चालक रामजी जगबिर यादव याला अटक केली आहे. नाशिक येथे शनिवारी सकाळी ट्रक आणि एका खासगी बसचा अपघात होऊन बसने पेट घेतल्याची दुर्घटना घडली होती. त्या अपघातात १२ लोकांचा मृत्यू झाला होता. तर जवळपास २५ ते ३० लोकं जखमी झाले होते. त्यानंतर ट्रक चालक फरार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. रामजी यादव असं आरोपी ड्रायव्हरचे नाव असून तो उत्तरप्रदेशचा रहिवाशी असल्याचे समोर आले आहे.


दरम्यान, काल पहाटे पाच ते साडेपाचच्या सुमारात नाशिक येथील नांदूर नाक्याजवळ अपघात झाला होता. या अपघातानंतर चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसने पेट घेतला. त्यानंतर काही प्रवाशांनी गाडीतून उड्या मारून आपले जीव वाचवले होते तर काहीजणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या भीषण अपघातानंतर ज्या ट्रकने या बसला धडक दिली होती त्या ट्रकचा ड्रायव्हर घटना स्थळावरून फरार झाला होता.


रामजी यादव असे त्या ड्रायव्हरचे नाव असून तो २७ वर्षाचा आहे. मुळचा उत्तरप्रदेशचा असलेल्या रामजी याला आडगाव पोलिसांनी अटक केली आहे. तर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम ३०४ अ २७९, ३३६, ३३७, ३३८, ४२७ नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच मोटर वाहन कायदा कलम १८४, १३४ अ ब अंतर्गत देखील गुन्हा दाखल केला आहे. अधिकचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

आत्महत्या करण्याऐवजी आमदाराला कापा; शेतकरी परिषदेत बच्चू कडूंची जीभ घसरली

बुलढाणा: गेल्या दोन महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान

दिवाळीचा आकाश कंदील बांधण्यासाठी झाडावर चढलेल्या तरुणाचा झाडावरून खाली कोसळून दुर्दैवी मृत्यू

पुणे : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आकाशकंदील बांधण्यासाठी झाडावर चढलेल्या एका तरुणाचा तोल जाऊन खाली पडल्याने

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर पुणेकरांची वाहनखरेदी धडाक्यात, गतवर्षी पेक्षा यंदा १,१५२ वाहनांची वाढ

पुणे : पुणेकरांनी यंदाच्या दिवाळीत वाहन खरेदीसाठी उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मी

गोखले बिल्डर्सच्या कंपन्यांमधून बाहेर पडल्याची कागदपत्रे सार्वजनिकरित्या उपलब्ध आहेत, मुरलीधर मोहोळ यांचे स्पष्टीकरण

पुणे: पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीनीच्या व्यवहारावरून केंद्रीय राज्यमंत्री तथा भारतीय

अमरावतीत सलग २५ तासांत १५ हजार ७७३ डोसे !

विख्यात शेफ विष्णू मनोहर यांचा विक्रम अमरावती : विख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी अमरावती शहरात सलग २५ तासांत एकूण

घोडबंदर रोडवर भीषण अपघात; एका महिलेचा जागीच मृत्यू, दुचाकीचालक गंभीर जखमी

ठाणे : घोडबंदर वाहिनीवरील विजय गार्डन स्काय वॉक ब्रिजखाली, रविवार रात्री